गेल्या काही दिवसांपासून एका अभिनेत्याची मोठी चर्चा सुरू आहे. तो अभिनेता म्हणजे रितेश देशमुख हा होय. ज्या दिवशी रितेश देशमुख बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार असे प्रेक्षकांना समजले होते, त्या दिवसापासून त्याच्या नावाची मोठी चर्चा सुरू आहे. कारण बिग बॉस हा असा शो आहे, ज्यामध्ये सूत्रसंचालन करताना चुकलेल्या सदस्यांची शाळादेखील घ्यावी लागते.

आजपर्यंत रितेश देशमुखला फक्त अभिनय करताना पाहिले असल्याने तो ही जबाबदारी पूर्ण करू शकेल का? कडक शब्दात सदस्यांची कानउघाडणी करणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडलेले पाहायला मिळाले. याआधीचे चारही पर्व महेश मांजरेकर यांनी बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालन केल्याने रितेश ही जबाबदारी तेवढ्याच ताकदीने निभावणार का? असे प्रश्न प्रेक्षकांना पडत होते. मात्र, बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला आता चार आठवडे पूर्ण झाले असून ज्या पद्धतीने रितेश देशमुख सूत्रसंचालन करत आहे, भाऊच्या धक्क्यावर चुकलेल्या सदस्यांची कडक शब्दांत कानउघाडणी करत आहे आणि योग्य निर्णय घेतलेल्या आणि वागलेल्या सदस्यांना शाबासकीची थाप देत आहे, हे पाहिल्यानंतर प्रेक्षक त्याच्यावर खूश असल्याचे पाहायला मिळत आहे.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nitin Gadkari on Omraje Nimbalkar
Maharashtra News Highlights : “ताजमहल लवकर बांधून झाला पण..”, ठाकरेंच्या खासदाराचा संसदेत मराठीत प्रश्न, नितीन गडकरींनी दिले ‘असे’ उत्तर
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
Siddharth Statement on crowd of 'Pushpa 2'
‘पुष्पा २’च्या ट्रेलर लाँचवेळी पाटण्यात जमलेल्या गर्दीवर सिद्धार्थचं वक्तव्य; म्हणाला, “जेसीबीचं काम सुरू असताना…”
Navri Mile Hitlarla
“आता भूतासारखीच…”, लीला नेमकं काय करणार? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय होणार

रितेश देशमुखने नुकतेच स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट करत तो बिग बॉस मराठीचे उत्तमप्रकारे सूत्रसंचालन करत असल्याचे म्हणत त्याचे कौतुक केले आहे.

काय म्हणाले नेटकरी?

नेटकऱ्यांनी रितेश देशमुखचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “रितेश सर लहानपणापासून आम्हाला शनिवार-रविवार एवढा खास वाटत नव्हता, तेवढा मला तुमच्या बिग बॉसमुळे वाटतो. कारण आज संपूर्ण महाराष्ट्राला भाऊचा धक्का बघितल्याशिवाय झोप येत नाही. खरंच सर, मनापासून सांगतो, तुम्हाला बघितल्यावर व तुमचे ते बोल ऐकल्यावर मन प्रसन्न होतं. तुम्ही जे निर्णय घेताय ते योग्य आहेत, संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने, “रितेश सर, बरं झालं तुम्ही मराठी बिग बॉसमध्ये आलात. अगदी शाळेसारखं शनिवार रविवारची खूप वाट बघत असतो.”

हेही वाचा: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधली लॉली, शितली, शालू अन्…; नम्रता संभेरावच्या वाढदिवशी प्रसाद खांडेकरची हटके पोस्ट

तर काही नेटकऱ्यांनी नुकत्याच झालेल्या भाऊचा धक्का या एपिसोडमध्ये रितेश देशमुखचा डायलॉग आवडल्याचे म्हटले आहे. “माझं नाव रितेश देशमुख, मला हलक्यात घेऊ नका” हा डायलॉग आजपर्यंतचा सगळ्यात आवडता डायलॉग असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

Story img Loader