प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन हे आजच्या तरुण पिढीतील गायकांपैकी लोकप्रिय गायक आहेत. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत त्यांनी सर्वांकडून कौतुकाची थाप मिळवली, तर त्यानंतर गेली अनेक वर्ष ते या क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. पण आता त्यांचा एक नवीन व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.

काही महिन्यांपूर्वी मुग्धा आणि प्रथमेशने ते दोघं लग्न करणार असल्याचं जाहीर केलं. सोशल मीडियावर सक्रिय राहून ते त्यांच्याबद्दलचे अपडेट्स चाहत्यांना देत असतात. ते दोघं गाण्याचे अनेक कार्यक्रम एकत्र करतातच, त्याबरोबरच ते एकत्र असले की एखादा गाण्याचा व्हिडिओही बनवतात आणि तो सोशल मीडियावर पोस्ट करतात. पण त्यांनी नुकताच पोस्ट केलेला गाण्याचा एक व्हिडिओ नेटकऱ्यांना खटकला.

A mechanism has been created by the ST administration to complain to the depot head about any problem in the journey of the ST Mumbai news
एसटी प्रवासात अडचण आल्यास थेट आगार प्रमुखांना फोन करा
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Kothrud Police Arrest Thieves Who Did Chain Snatching Pune news
चेनस्नॅचिंग करणार्‍या चोरट्यांना बेड्याच; परराज्यातील आरोपीचा समावेश  
Pimpri, Notice to Engineers, Road Repair Works pimpri,
पिंपरी : रस्ते दुरुस्तीच्या कामांवर देखरेख ठेवणाऱ्या अभियंत्यांना नोटीस; काय आहे कारण?
Success Story An inspiring journey from selling balloons
Success Story: रस्त्यांवर फुगे विकण्यापासून ते करोडोंची कंपनी उभी करण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
Success Story of Dr Akram Ahmad
Success Story : इच्छा तेथे मार्ग! सहा लाख रुपयांची नोकरी सोडून शेतकऱ्याच्या मुलानं गाठलं परदेश; वाचा मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी स्टार्टअप लाँच करणाऱ्याची यशोगाथा
Suicide in uttarpradesh
Man Suicide in UP : “आयुष्यात हवं ते करा पण लग्न करू नका” म्हणत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या!
Cockroach in Coffee
Cockroach in Coffee : मालाडच्या इनॉर्बिट मॉलमधल्या कॅफेत कोल्ड कॉफीत आढळलं झुरळ, ग्राहकाची थेट पोलिसात धाव

हेही वाचा : मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेचं शिक्षण किती? दोघांची शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून व्हाल थक्क

मुग्धा आणि प्रथमेश यांनी नुकताच त्या दोघांचा गातानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. यामध्ये मुग्धा गाडी चालवताना दिसत आहे तर प्रथमेश तिच्या बाजूला बसलेला दिसत आहे. गाडीतून प्रवास करताना त्या दोघांनी ‘ओ रंगरेज’ हे गाणं गायलं आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. ते दोघेजण नेहमीप्रमाणेच ते गाणं खूप छान गायले पण मुग्धा गाडी चालवत असताना प्रथमेशने हा व्हिडिओ शूट केल्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांची शाळा घेतली.

आणखी वाचा : “तिचा नवरा माझा…”, अखेर प्रथमेश लघाटेने दिली त्याच्या आणि स्पृहा जोशीच्या नात्यावर प्रतिक्रिया

त्या दोघांनी गाडी चालवताना हा व्हिडिओ शूट केल्याचं अनेकांना अजिबात आवडलं नाही. तर या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तशा कमेंट्स करत त्यांना हे न करण्याचा सल्ला दिला. एकाने लिहिलं, “जे काय करायचं ते गाडी थांबवून करा. नाहीतर ड्राइवर घ्या आणि तुम्ही मस्त लाइव्ह करा. लोकांचं प्रेम आहे तुमच्यावर. त्याची जबाबदारी पण स्वीकारा.” दुसऱ्याने लिहिलं, “अरे बाबांनो… सर्वांनी वर सांगितलंच आहे पण मी पुन्हा सांगतो. जरा गाडी थांबवून चांगला स्पॉट बघून रील करा… भलतं धाडस नको. काळजीने सांगतो आहे, राग मानू नका.”

तर तिसरा नेटकरी म्हणाला, “गाणं गाताना ड्रायव्हिंग करणं हे खूप धोकादायक आहे.” तर आणखी एकाने लिहिलं, “तुम्ही यूथ आयकॉन्स आहात, असा व्हिडिओ बनवू नका, लोक तुम्हाला फॉलो करतात. सेलिब्रेटी म्हणून ही तुमची जबाबदारी आहे.” त्यामुळे आता त्यांच्या गाण्याबरोबरच त्यांच्या या कृतीकडेही सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.