मंगळवारी सगळीकडे धुळवडीची धूम पाहायला मिळाली. टीव्ही कलाकार आणि बॉलिवूड कलाकारांनी देखील रंगांची उधळण केली आणि एकमेकांना रंग लावत धुळवड साजरी केली. ‘बिग बॉस १६’ मधील स्पर्धक आणि टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री सुंबूल तौकीर खाननेही धुळवड साजरी केली. पण, या सेलिब्रेशनमुळे नेटकरी तिच्यावर संतापले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Video: “यांना पेंग्विनचा त्रास आहे अन्…” खांद्यावर पोपट ठेवून होळीच्या शुभेच्छा देणाऱ्या अमृता फडणवीस ट्रोल

‘इन्स्टंट बॉलिवूड’ने सुंबूल तौकीर खानच्या होळी सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत संताप व्यक्त केला आहे. त्याचं कारण म्हणजे सुंबूल पाण्याच्या पाइपने सर्वांवर पाणी उडवत होती. पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी केल्याने सुंबूलला नेटकऱ्यांनी खडे बोल सुनावले आहेत.

‘पाण्याने होळी खेळायची काय गरज आहे, रंगाने पण खेळता येते ना’, ‘हे आहेत सुशिक्षित अडाणी लोक जे इतक्या प्रमाणात पाण्याची नासाडी करत आहेत’, ‘आता पाणी वाया घालवत आहे आणि उद्या पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास पालिकेला शिव्या घालायला तयार असेल’, ‘पाणी वाया घालवू नकोस’, अशा प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netizens slam sumbul touqeer khan for wasting water in holi celebration hrc