अभिनेता सोनू सूद सध्या एमटीव्हीवरील ‘रोडिज कर्म या कांड’ शो होस्ट करत आहे. यानिमित्तानं तो देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे. तो त्या ठिकाणी असलेल्या छोट्या छोट्या व्यावसायिकांचा व्हिडीओ शेअर करून, त्यांना प्रमोट करत आहे. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोनू सूदनं नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे; ज्यामध्ये तो अभिनेत्री रिया चक्रवर्तीसाठी डोसा बनवताना दिसत आहे. पण, हे पाहून नेटकरी भडकले आहेत. त्यांनी सोनू सूदला रियाबरोबर व्हिडीओ न करण्याचा सल्ला दिला आहे.
या व्हिडीओमध्ये एका छोट्या व्यावसायिकाच्या दुकानावर सोनू सूद डोसे बनवताना दिसत आहे. यावेळी तो रियाला बोलावतो आणि “डोसा खाणार का?” असं विचारतो. तेव्हा रिया म्हणते, “जर तू बनवणार असशील, तर का खाणार नाही. थोडा क्रिस्पी डोसा बनव.” मग सोनू म्हणतो, “मसाला डोसा खाणार की साधा डोसा?” यावर रिया म्हणते, “मला साधा डोसाच दे. याचे किती पैसे द्यावे लागतील.” तर सोनू म्हणतो, “फ्रीमध्ये खा.” या व्हिडीओत सोनू फक्त रियालाच नाही, तर इतर लोकांनासुद्धा डोसा आणि पुरी बनवून देताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत सोनू सूदनं लिहिलं आहे, ‘भटुरे आणि डोशाची फ्रॅंचायजी पाहिजे असेल, तर संपर्क साधा.”
हेही वाचा –…अन् सलमान खानने ‘बिग बॉस ओटीटी’च्या प्रेक्षकांची मागितली जाहीर माफी, नेमकं काय घडलं?
हेही वाचा – ‘रामायण’ मालिकेतील लक्ष्मणाचा आलियाच्या सीतेच्या भूमिकेवर आक्षेप; म्हणाले, “अभिनेत्री टॅलेंटेड पण…”
सोनू सूदचा हाच व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे, ‘प्लीज सर, या मुलीबरोबर कोणताही व्हिडीओ करू नका.’ तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलंय, ‘रिया चक्रवर्ती ही सुशांत सिंह राजपूतचा खून करणारी आहे.’ तसेच तिसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं आहे, ‘सोनूभाई आपल्याविषयी खूप आदर आहे. परंतु, अशा कलाकारांपासून दूर राहा; जे पुढे जाऊन तुमचं नाव आणि इज्जत दोन्ही धुळीला मिळवतील.’
काल अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा वाढदिवस होता. यानिमित्तानंही सोनू सूदनं इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून रियाला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानं रियाचा फोटो शेअर करत लिहिलं होतं, ‘गँग लीडरला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा! तुझ्यावर सदैव आशीर्वाद राहो.’
हेही वाचा – विद्या बालनवर 5 स्टार हॉटेलसमोर आली होती भीक मागायची वेळ? अभिनेत्रीनं सांगितला ‘तो’ किस्सा
दरम्यान, सोदू सूद सध्या होस्ट करत असलेल्या ‘रोडिज कर्म या कांड’ या शोमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती गँग लीडरच्या भूमिकेत आहे. तसेच तिच्याबरोबर प्रिन्स नरुला आणि गौतम गुलाटी हेही गँग लीडर म्हणून काम करत आहेत. नुकतीच या शोमध्ये ‘भारत पे’चे माजी एम. डी. अशनीर ग्रोवरची एंट्री झाली आहे.