‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. कारण मालिकेत मोठा ट्विस्ट सुरू झाला आहे. कालपासून (२० नोव्हेंबर) मालिकेची कथा २५ वर्ष पुढील दाखवली जात आहे. गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा सुरू झाली आहे. त्यामुळे मालिकेत गौरी, जयदीप, माई व्यतिरिक्त सगळे नवे चेहर पाहायला मिळत आहे. पण ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील नवं पर्व पाहून प्रेक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Video: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यादरम्यान शाहरुख खानने रणवीरकडे दुर्लक्ष करत दीपिका पदुकोणला मारली मिठी? व्हिडीओ झाला व्हायरल

काही दिवसांपूर्वी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत शालिनी शिर्के-पाटील कुटुंबाचा अंत करताना दाखवण्यात आलं. त्यानंतर आता गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा सुरू झाली आहे. पण नवी कथा सुरू होताच प्रेक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “एकदम भंगार”, “मालिका बंद करा”, “खरोखर सगळे मेले पाहिजे होते”, अशा अनेक प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत.

‘स्टार प्रवाह’च्या सोशल मीडियावर काही तासांपूर्वी एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. ज्यामधून कशी वाटली पुनर्जन्माची कथा? असं प्रेक्षकांना विचारण्यात आलं. याच पोस्टवर प्रेक्षकांची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहीलं, “मालिकेचं नाव बदला, दुःख म्हणजे काय असतं” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहीलं, “तुमच्या मालिकेच्या नावाप्रमाणे तुम्ही काहीच दाखवत नाही.. फक्त दुःख म्हणजे काय असतं तेच समजतं…” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहीलं, “मूर्खपणाचा कळस आहे…” चौथ्या नेटकऱ्याने लिहीलं, “मालिका बंद करा.”

हेही वाचा – अभिनेत्री दीपाली पानसरे ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत पुन्हा एकदा खलनायिकेच्या रुपात; पहिला लूक आला समोर

हेही वाचा – अमृता देशमुख-प्रसाद जवादेच्या लग्नात ‘या’ जोडीने वेधलं लक्ष, दोघांचे फोटो होतायत व्हायरल

दरम्यान, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या नव्या पर्वात बऱ्याच नव्या कलाकारांची एन्ट्री झाली आहे. अभिनेत्री हर्षदा खानविलकर, गिरीश ओक, अमेय बर्वे, मयुर पवार असे बरेच नवे कलाकार मालिकेत झळकले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netizens troll again sukh mhanje nakki kay asta marathi serial pps