‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंतरा म्हणजे अभिनेत्री योगिता चव्हाण नेहमी चर्चेत असते. योगिताने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील तिने साकारलेली अंतरा अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. या मालिकेनंतर योगिता ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकली. या पर्वामुळे ती अधिक प्रसिद्धीझोतात आली. काही दिवसांपूर्वी योगिता पत्नी सौरभ चौघुलेबरोबर इंडोनेशियातील बाली येथे फिरायला गेली होती. याचं बाली ट्रीपचे व्हिडीओ, फोटो योगिता सध्या सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे.
नुकतेच योगिता चव्हाणने बालीच्या समुद्रकिनारावरील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने बिकिनीवर आकाशी रंगाचं शर्ट घातलेलं पाहायला मिळत आहे. तसंच हातात मोठी टोपी आणि डोळ्यांवर गॉगल अशा हॉट लूकमध्ये योगिता दिसत आहे. पण योगिताचे बालीमधील हे फोटो पाहून नेटकरी भडकले आहेत. काही नेटकऱ्यांनी तिच्या या लूकचं कौतुक केलं असलं तरी काही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
“असे फोटो टाकून प्रतिमा खराब करत आहात”, “आपली मराठी संस्कृती आहे, त्या संस्कृतीचं भान ठेवा म्हणजे झालं”, “असे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा उद्देश काय? प्रसिद्धी आणि पैशासाठी काहीपण”, “तुम्ही जे मालिकेत करता त्यानुसार वागा”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.
एका नेटकऱ्याने लिहिलं, “काय घालायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवावं. पण बिकिनी घातली म्हणून फोटो पोस्ट केले पाहिजेत का? तुम्हाला असे कपडे घालून, लोकांना पुढे दाखवून काय सिद्ध करायचं असतं? आजूबाजूला बलात्काराची प्रकरणं एवढी वाढली आहेत, तुम्ही कलाकार म्हणून एक पोस्ट कधी करत नाही. पण घाणेरडे फोटो पोस्ट करण्यात अभिमान वाटतो.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “योगिता मी तुला ‘बिग बॉस मराठी’मध्ये पाहिलं होतं. तू खूप सभ्य वाटतं होतीस. हे काय आहे?” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, काम मिळवण्यासाठी काही पण करावं लागतंय.

दरम्यान, गेल्यावर्षी ३ मार्चला योगिता आणि सौरभचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं. अचानक दोघांनी लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने योगिता आणि सौरभ बालीला फिरायला गेले होते.