अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री जान्हवी तांबट यांची प्रमुख भूमिका असलेली ‘अजब प्रीतीची गजब कहाणी’ मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अजिंक्यने साकारलेला राजवीर आणि जान्हवीने साकारलेली मयुरी आता घराघरात पोहोचली आहे. लवकरच मालिकेला रंजक वळण येणार आहे. राजवीर समोर भाऊसाहेब आणि मयुरी यांचं सत्य उघड होणार आहे.

मयुरीचा एक प्रेमळ मित्र तर भाऊसाहेबचा समजूतदार बॉस राजवीर हा एक सच्चा माणूस आहे. मयुरीकडे आकर्षित होणारा राजवीर आपल्या जवळच्या बॉडीगार्डला म्हणजेच भाऊसाहेबला आपल्या दिलाची कहाणी मित्रत्वाच्या नात्याने सांगत आलेला असतो. मयुरीला राजवीरचं प्रेम कळतंय पण परिस्थितीच अशी आली आहे की मयुरीला राजवीरवरचं प्रेम त्याच्यापासून लपवावं लागतंय. पण नियतीनेच आता मयुरी आणि राजवीर या दोघांना एकत्र आणलंय. आपण राजवीरची फसवणूक करतोय, असं मयुरीला वाटतं असत. त्यामुळे मयुरी आपल्या मैत्रिणीकडे मन मोकळं करत असते. तेव्हाच राजवीर तिला पाहतो आणि सगळं सत्य त्याच्या समोर उघडतं. मयुरी हीच भाऊसाहेब आहे, हे राजवीरला समजतं.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

हेही वाचा – Video: ‘द आर्चीज’च्या स्क्रीनिंग दरम्यान ऐश्वर्या राय-बच्चनने भाचा अगस्त्यची केली चेष्टा, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा – सुबोध भावे हिंदी चित्रपटामध्ये का नाही दिसत? अभिनेता कारण सांगत स्पष्टच म्हणाला…

राजवीरने आजवर भाऊसाहेबशी एक मित्र म्हणून बोलताना आपल्या प्रेमाची कबुली आधीच दिली आहे. त्यामुळे मयुरी आपल्याविषयी काय विचार करेल? हा प्रश्न त्याला सतावेल की भाऊसाहेबने उर्फ मयुरीने राजवीरच्या साधेपणाचा फायदा घेतला असा त्याचा समज होईल? या दोघांच्या प्रेमाला लागलेलं हे ग्रहण आता तरी सुटणार का? राजवीर आणि मयुरी एकत्र येतील का? साधा-सरळ-समजूतदार राजवीर अशाही परिस्थितीत शांत चित्ताने विचार करून मयुरीची बाजू समजून घेईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर येत्या काळात मालिकेत पाहायला मिळणार आहे.

Story img Loader