Lakhat Ek Amcha Dada Upcoming Episode : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत सध्या तुळजाचा लग्नसोहळा सुरू आहे. मुहूर्तमेढ आणि मेहंदीचा कार्यक्रम झाला असून आता बांगड्या भरण्याचा, हळदीचा कार्यक्रम बाकी आहे. ६ सप्टेंबरला तुळजा लग्नबंधनात अडकणार आहे. पण तुळजा सिद्धार्थ की सत्यजितशी लग्नगाठ बांधणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. अशातच आता तुळजाचं लग्न सूर्याशी होणार असल्याचं समोर आलं आहे. याचा खुलासा ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेच्या नव्या प्रोमोमधून झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. याचा प्रोमो ‘झी मराठी’च्या सोशल मीडिया पेजवर नुकताच शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये लग्नमंडपात तुळजाची सर्वजण वाट पाहताना दिसत आहेत. त्यामुळे डॅडींना विचारलं जात की, तुळजाला यायला एवढा उशीरा का लागतोय? तितक्यात सत्यजित डॅडींना फोनवर तुळजा व सूर्याचा व्हिडीओ दाखवून म्हणतो की, ती येणार नाही. यांची पोरगी सूर्याचा हात धरून पळून गेली आहे. पण सूर्या तुळजाचं स्वप्न म्हणजेच तिच लग्न सिद्धार्थबरोबर होण्यासाठी पळवून घेऊन जातो, याची कोणालाच कल्पना नसते. त्यामुळे “पोरीनं आई-पापाचं तोंड काळ केलं”, असं लोकं म्हणू लागतात.

हेही वाचा – “माझं संपूर्ण जगणं…”, अविनाश नारकरांनी सासऱ्यांसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाले…

तितक्याच सूर्या तुळजाला घेऊन परत लग्नमंडपात येताना दिसत आहे. पण त्यानंतर सूर्याला पाहून तुळजाचा भाऊ त्याला बेदम मारायला सुरुवात करतो. यावेळी सूर्या डॅडींची माफी मागत म्हणतो की, डॅडी चूक झाली. पण डॅडी सूर्याला रागात लाथ मारतात आणि म्हणतात, “आमची इज्जत आमच्यासाठी सगळ्यात मोठी आहे. आता तिच्याशी लग्न करायचं. तू मंगळसूत्र तिच्या गळ्यात बांध. हिच तुमची शिक्षा. आता या अक्षदा नाहीत माणूस मेल्यानंतर तोंडात मारायचे तांदूळ आहेत.” त्यानंतर डॅडी तुळज्याचा तोंडात तांदूळ घालतात आणि आमच्यासाठी तुळजा मेली असं सांगून लग्नमंडपातून निघून जातात. यामुळे तुळजाला धक्काच बसतो.

हेही वाचा – “मी मातोश्रीवर गेलेलो…”, अभिजीत सावंतने बाळासाहेबांच्या भेटीचा सांगितला किस्सा, म्हणाला, “उद्धव ठाकरेंनी मला…”

डॅडी लग्नमंडपातून निघून तुळजाच्या फोटोला हार घालतात आणि तिच्या नावाची अंघोळ करताना दाखवलं आहे. त्यामुळे आता सूर्या आणि तुळजा पुढे काय करणार? दोघांचा संसार कसा असणार? डॅडी दोघांना आणखी काय-काय शिक्षा देणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New twist in lakhat ek amcha dada serial daddy got tulja married to surya pps