दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेली ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या मालिकेचे ५० हून अधिक भाग प्रसारित झाले आहेत. या मालिकेतील आता प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं आहे. कमी वेळात या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकून पहिल्याच आठवड्यात टीआरपीच्या यादीत प्रथम स्थान गाठला होतं. सध्या टीआरपीच्या यादीत ‘प्रेमाची गोष्ट’ ही पहिल्या पाचमध्ये आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या मालिकेमध्ये सागर आणि मुक्ताच नवरा बायको म्हणून सुरू असलेलं नाटक मुक्ताच्या आईसमोर उघडं झालं आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. मुक्ताच्या आईने सागरबरोबर कडाक्याचं भांडणं केलं आहे. पण दुसऱ्याबाजूला सागरची आई स्टोअररुम मध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडल्यामुळे सगळ्यांना धक्का बसला आहे. इंद्राला स्टोअररुममध्ये नक्की कोणी बंद केलं? यावरून वाद सुरू आहेत. पण मिहीरने मुक्ताच्या आईला स्टोअररुमची कडी लावताना पाहिलेलं असतं. त्यामुळे तो सागरला मुक्ताची आई स्टोअररुमच्या बाहेर होती असं सांगतो. यावरून सागर मुक्ताच्या आईला जाब विचारतो. तितक्यात मुक्ता आणि मिहिका सागर आणि मिहिरीशी वाद घालू लागतात. हे आपल्या आईने केलंच नाही असं सांगतात. पण तितक्याच लकी येऊन हे वाद थांबवतो आणि मग सगळेजण इंद्राला घरी घेऊन जातात. पण घरी जात असताना मुक्ताची आई लकीला येऊन तिने त्याच्या आईला स्टोअररुममध्ये बंद केल्याचं कबुल करते. हे ऐकून लकीला धक्का बसतो.

हेही वाचा – “…प्रियाला हाण हाण हाणा”, ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुनने सायलीसाठी घेतला मजेशीर उखाणा

हे सगळं नाट्य झाल्यानंतर मालिकेत एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. लवकरच मालिकेत सईच्या कस्टडीची सुनावणी होणार आहे. याचा नुकताच एक प्रोमो ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सईला विचारलं जात की, तू मम्मी आणि पप्पा या दोघांपैकी तू कोणाबरोबर राहशील बरं? बाळा सांग तुला कोणाबरोबर राहायचं आहे? यावर सई मम्मी (सावनी) आणि पप्पाची (सागर) निवड न करता ती म्हणते की, ‘मला मुक्ता अँटीकडे राहायचं आहे.’ हे ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो आणि मुक्ता भावुक होते.

हेही वाचा – Video: “महाराष्ट्रात जन्माला आलेला मारवाडी हा मराठी…” छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत जितेंद्र जोशीने सांगितली ‘मराठी’ची व्याख्या

दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका ४ सप्टेंबरपासून सुरू झाली होती. आता मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अटळ स्थान निर्माण केलं आहे. तेजश्री प्रधान व राज हंचनाळे व्यतिरिक्त शुभांगी गोखले, अपूर्वा नेमळेकर, संजीवनी जाधव असे बरेच कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New twist in premachi goshta marathi serial who will sai choose sagar or savani pps
Show comments