Premachi Goshta: मुक्ता-सागरचं लग्न झाल्यापासून ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सतत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. एकाबाजूला मुक्ता-सागरचं प्रेम खुलतं असलं तरी दुसऱ्या बाजूला सावनी-हर्षवर्धनची कुरघोडी सुरुच आहे. अशात मालिकेत लवकर मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

सध्या मालिकेत अजूनही सई नेमकी कोणाची? हर्षवर्धन की सागरची? हाच तिडा सुटलेला नाही. हर्षवर्धनच्या डावाला सागर पूर्णपणे बळी पडला आहे. सागरला अजूनही वाटत आहे की, सई हर्षवर्धनची मुलगी आहे. त्यामुळे आजच्या भागात सागर पुन्हा दारू पिऊन सावनीच्या घरी तमाशा करता पाहायला मिळणार आहे. सावनीचा हात पकडून तिला विचारतो, “खरं सांग, सई आपलीच मुलगी आहे ना?” पण सावनी त्याला ढकलून देते आणि सागर खाली पडतो.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Heart-Melting Video
VIDEO : पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं! तरुणाने सादर केली प्रेमावरची कविता; म्हणाला,”एकदा प्रेमात पडल्यावर पुन्हा पडता येत नाही” VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
an old lady enjoying Ropeway by wearing nauwari
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे! नऊवारीत मराठमोळ्या आज्जीने घेतला रोप वे चा आनंद; व्हिडीओ होतोय व्हायरल
Premachi Goshta actress Swarda Thigale react on troller
“रिप्लेसमेंटवाल्या भूमिका कलाकारांनी घेऊ नये…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील बदलावर युजरची प्रतिक्रिया; नवी मुक्ता म्हणाली, “आजही कलेचे…”
Loksatta viva Jungle Look From Sea Lover to Explorer Marine Explorer
जंगलबुक: समुद्रप्रेमी ते संशोधक

त्यानंतर याबाबत सावनी मुक्ताला फोन करून सांगते. तेव्हा मुक्ता मध्यरात्री सागरला घेण्यासाठी सावनीच्या घरी जाते. यावेळी सावनी संपूर्ण घडलेली घटना खोटी रंगवून मुक्ताला सांगते. सागरने तिचा गळा पकडला, मारलं, असं मुक्ताला सांगते. हे ऐकून मुक्ताला धक्काच बसतो. पण मुक्ता सगळं ऐकून सागरला व्यवस्थित घरी घेऊन येते. मुक्ता सागरला समजवते. सावनीला विसरा आणि सईच्या प्रेमाचा स्वीकार करा, असं सागरला सांगते. या सर्व नाट्यानंतर मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. सागरचा मोठा मुलगा आदित्यची एन्ट्री होणार आहे.

हेही वाचा – अशोक सराफांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर होताच ज्येष्ठ अभिनेत्रीची खास पोस्ट, म्हणाल्या, “माझ्या अपघातानंतर…”

‘सीरियल जत्रा’ या इन्स्टाग्राम पेजवर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत पुढील भागात काय घडणार आहे? याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये आदित्य सागरला फोन करून बोलतो की, मी सावनी मम्माकडे आहे. तुम्ही तिथे मला भेटायला या. त्यानंतर सागर फोन ठेवून म्हणतो, “मला असं वाटत, काहीतरी त्याच्याबरोबर वाईट घडणार आहे.” मग सागर आदित्यला भेटण्यासाठी सावनीच्या घरी जातो. तेव्हा हर्षवर्धन सागरला म्हणतो की, तुला ही फाइल घेऊन आदित्यने बोलावलं आहे. थोड्याच वेळ भेटायचं हा. तुझी वेळ आता सुरू झाली. त्यामुळे बऱ्याच वर्षांनंतर आदित्यला भेटल्यानंतर सागरची रिअ‍ॅक्शन काय असते? हर्षवर्धनने दिलेल्या फाइलमध्ये नेमकं काय असतं? हे येत्या काळात समजले.

हेही वाचा – गौतमी देशपांडेच्या वाढदिवसानिमित्ताने नवरा स्वानंद तेंडुलकरची खास पोस्ट, म्हणाला, “तू माझ्या पाठीशी…”

दरम्यान, तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. आता या मालिकेतील मुक्ता, सागर, सई ही पात्र प्रेक्षकांच्या आपल्या घरातील वाटतं आहेत. त्यामुळे ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

Story img Loader