Premachi Goshta: मुक्ता-सागरचं लग्न झाल्यापासून ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सतत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. एकाबाजूला मुक्ता-सागरचं प्रेम खुलतं असलं तरी दुसऱ्या बाजूला सावनी-हर्षवर्धनची कुरघोडी सुरुच आहे. अशात मालिकेत लवकर मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सध्या मालिकेत अजूनही सई नेमकी कोणाची? हर्षवर्धन की सागरची? हाच तिडा सुटलेला नाही. हर्षवर्धनच्या डावाला सागर पूर्णपणे बळी पडला आहे. सागरला अजूनही वाटत आहे की, सई हर्षवर्धनची मुलगी आहे. त्यामुळे आजच्या भागात सागर पुन्हा दारू पिऊन सावनीच्या घरी तमाशा करता पाहायला मिळणार आहे. सावनीचा हात पकडून तिला विचारतो, “खरं सांग, सई आपलीच मुलगी आहे ना?” पण सावनी त्याला ढकलून देते आणि सागर खाली पडतो.
त्यानंतर याबाबत सावनी मुक्ताला फोन करून सांगते. तेव्हा मुक्ता मध्यरात्री सागरला घेण्यासाठी सावनीच्या घरी जाते. यावेळी सावनी संपूर्ण घडलेली घटना खोटी रंगवून मुक्ताला सांगते. सागरने तिचा गळा पकडला, मारलं, असं मुक्ताला सांगते. हे ऐकून मुक्ताला धक्काच बसतो. पण मुक्ता सगळं ऐकून सागरला व्यवस्थित घरी घेऊन येते. मुक्ता सागरला समजवते. सावनीला विसरा आणि सईच्या प्रेमाचा स्वीकार करा, असं सागरला सांगते. या सर्व नाट्यानंतर मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. सागरचा मोठा मुलगा आदित्यची एन्ट्री होणार आहे.
‘सीरियल जत्रा’ या इन्स्टाग्राम पेजवर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत पुढील भागात काय घडणार आहे? याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये आदित्य सागरला फोन करून बोलतो की, मी सावनी मम्माकडे आहे. तुम्ही तिथे मला भेटायला या. त्यानंतर सागर फोन ठेवून म्हणतो, “मला असं वाटत, काहीतरी त्याच्याबरोबर वाईट घडणार आहे.” मग सागर आदित्यला भेटण्यासाठी सावनीच्या घरी जातो. तेव्हा हर्षवर्धन सागरला म्हणतो की, तुला ही फाइल घेऊन आदित्यने बोलावलं आहे. थोड्याच वेळ भेटायचं हा. तुझी वेळ आता सुरू झाली. त्यामुळे बऱ्याच वर्षांनंतर आदित्यला भेटल्यानंतर सागरची रिअॅक्शन काय असते? हर्षवर्धनने दिलेल्या फाइलमध्ये नेमकं काय असतं? हे येत्या काळात समजले.
हेही वाचा – गौतमी देशपांडेच्या वाढदिवसानिमित्ताने नवरा स्वानंद तेंडुलकरची खास पोस्ट, म्हणाला, “तू माझ्या पाठीशी…”
दरम्यान, तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. आता या मालिकेतील मुक्ता, सागर, सई ही पात्र प्रेक्षकांच्या आपल्या घरातील वाटतं आहेत. त्यामुळे ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.