मुक्ता-सागरच्या लग्नामुळे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला एक नवं वळणं मिळालं आहे. सईच्या प्रेमाखातर लग्नाला तयार झालेल्या मुक्ता-सागरने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आता खऱ्या अर्थाने मुक्ता-सागरच्या प्रेमाची गोष्टला सुरुवात होणार आहे. पण त्यापूर्वी मालिकेत सईमुळे एक मोठा ट्विस्ट येणार आहे. ज्यामुळे मुक्ता-सागरसह कोळी कुटुंबाला मोठा धक्का बसणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या कालच्या भागात मुक्ताची पाठवणी होताना पाहायला मिळालं. त्यानंतर मुक्ता-सागरचा कोळी कुटुंबात गृहप्रवेश झाला. यावेळी मुक्ता खास उखाणा घेताना पाहायला मिळाली. पण जेव्हा सागरला उखाणा घ्यायला सांगितला तेव्हा त्याला महत्त्वाच्या क्लाइंडचा फोन आला. ज्यामुळे सागरचा उखाणा घ्यायचा राहून गेला. मात्र नंतर हसत-खेळत मुक्ताचं कोळी कुटुंबाने स्वागत केलं. मग मुक्ताने लकीला सईला घरी सोडण्यासाठी सांगितलं. तेव्हा सागरच्या वडिलांनी सईला समजावलं. मुक्ता आई आणि सागर पप्पाचं लग्न झालंय हे सावनीला सांगून नको म्हणून. मग लकी सईला घरी सोडायला घेऊन गेला.
तितक्यात कपडे बदलून सागर ऑफिसला निघतो. हे पाहून सागरचे वडील त्याला थांबवतात आणि स्वातीला हनिमूनचा प्लॅन सांगायला सांगतात. कोळी कुटुंबाने मुक्ता-सागरचा हनिमूनचा खास प्लॅन केला असतो. आजच्या भागात मुक्ता-सागरचा हनिमून पाहायला मिळणार आहे. पण या हनिमून दरम्यान एक गडबड होणार असून यामुळे मुक्ताला सागरच्या बाबतीत पुन्हा गैरसमज होणार आहे. हे सर्व काही आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. पण त्यानंतर सईच्या एका निर्णयामुळे मालिकेत ट्विस्ट येणार असून यामुळे मुक्तासह कोळी कुटुंबाला मोठा धक्का बसणार आहे.
हेही वाचा – “…ते २०२४मध्ये पूर्ण करायचं आहे”, ‘झिम्मा’ गर्ल्स यंदा मागे कोणती गोष्ट सोडणार? सायली संजीव म्हणाली…
मुक्ता-सागरच्या हनिमूननंतर दुसऱ्याच दिवशी सईच्या कस्टडीची सुनावणी होणार आहे. मुक्ताबरोबर सागरचं लग्न झाल्यामुळे सई आपल्याकडेच येणार, असं कोळी कुटुंबाला वाटत असतं. पण कोर्टात एक वेगळं नाट्य पाहायला मिळणार आहे. सुनावणीच्या सुरुवातीला मुक्ता-सागरचं लग्न झाल्यामुळे सावनीला मोठा धक्का बसतो. पण त्यानंतर सई कोळी कुटुंबाला मोठा धक्का बसेल असणार निर्णय घेते. गेल्या सुनावणीदरम्यान जसं सईला विचारलं गेलं होतं, तुला कोणाबरोबर राहायला आवडेल. तसंच या सुनावणीच्या वेळी सईला विचारलं जातं. तेव्हा कोळी कुटुंबाला खात्री असते की, सई मुक्ताचं नाव घेणार. पण तसं होतं नाही. सई सावनीचं नाव घेते आणि यामुळे मुक्ता-सागरसह कोळी कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकते. सई असं का करते? हे कोणाच्या लक्षात येत नाही. पण यामुळे सावनी-हर्षवर्धनला खूप आनंद झालेला असतो.
हर्षवर्धनने हा नवा डाव रचलेला असतो. मुक्ता-सागरने लग्न केलंय हे हर्षवर्धनला माहित असतं. त्यामुळे तो कोर्टाच्या सुनावणीपूर्वी सईला सांगतो की, तुझी मुक्ता आई तुझ्या घरी राहायला आली ना. मला सगळं माहित आहे. तुझ्या मुक्ता आईनेचं मला सगळं सांगितलं. त्यामुळे तू आता खोटं बोलू नकोस. तुला खोटं बोलायला मुक्ता आईने नाही शिकवलंय. हे ऐकून सई हो म्हणते. त्यानंतर हर्षवर्धन तिला म्हणतो, तू आता कोर्टामध्ये तुला सावनी आईकडे राहायचं आहे म्हणून सांग. तेव्हा सई त्याला नकार देते. मग हर्षवर्धन तिच्याशी खोटं बोलतो. तो सईला सांगतो, “तू जन्माला आल्यानंतर तुझी सावनी आई सहा महिन्यातच तुला सोडून गेली. पण आताही तुझ्याबाबतीत असंच घडणार आहे. काही दिवसात तुझी मुक्ता आई तुला कायमची सोडून जाणार आहे. त्यामुळे तुला जर मुक्ता आई त्या घरात राहायला हवी असेल तर तुला सावनी आईचं नाव घ्यावं लागणार. नाहीतर मुक्ता आई तुला सोडून जाईल.” हर्षवर्धनच्या याच भीतीने सई कोर्टात तिचा निर्णय बदलते आणि सावीनचं नाव घेते.
हेही वाचा – “ती गेली…”, अभिनेता आस्ताद काळेच्या आईचं निधन, भावुक पोस्ट करत म्हणाला…
पण यानंतर मुक्ता आता सईने निर्णय का बदलला? तिच्यावर कोणी दबाव आणला का? या प्रश्नांची उत्तर शोधून काढणार आहे. त्यामुळे आता मुक्ता हर्षवर्धनचा हा डाव कसा उधळून लावते? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.