‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. अधिपतीचे वडील म्हणजेच चारुहासची वाचा परत आली आहे. अखेर अक्षराच्या प्रयत्नांना यश आलं आहे. वाचा परत येताच चारुहासने भुवनेश्वरीचा खरा चेहरा अक्षरासमोर आणला आहे. भुवनेश्वरी अधिपतीची जन्मदाती आई नसल्याचं सत्य चारुहासने अक्षराला सांगितलं आहे. त्यामुळे आता अक्षरा भुवनेश्वरीचं सत्य अधिपती समोर आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
नुकताच ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये अक्षरा अधिपतीला भुवनेश्वरीचं सत्य सांगत आहे. पण ते ऐकून अधिपतीचा राग अनावर होतो आणि तो अक्षरावर हात उचलतो. नक्की काय घडतं? जाणून घ्या…
प्रोमोमध्ये सुरुवातीला अधिपती म्हणतो, “आमच्या आईसाहेबांसारखी माया आजवर आमच्यावर कोणीच केली नाही.” यावर अक्षरा म्हणते, “ती माया नव्हती तो सूड होता.” हे ऐकून अधिपतीचा पारा चढतो. तो म्हणतो, “तुमचा आता एक शब्द ऐकून घेणार नाही मी.” तरीही अक्षरा म्हणते, “ऐकावं लागेल. कारण आता मला सगळं कळलंय.” अधिपती रागात विचारतो, “काय कळलंय?” अक्षरा सत्य सांगतं म्हणते, “भुवनेश्वरी मॅडम तुमच्या खऱ्या आई नाहीयेत. यांच्यापासून दूर राहा. नाहीतर एक दिवस तुम्हाला त्या खरं जीवे मारतील.” अक्षराच हे बोलणं ऐकून अधिपती रागाच्या भरात हात उचलतं म्हणतो, “मास्तरीण बाई…”
हेही वाचा – Video: ‘झी मराठी’वरील ‘पारु’ मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित, प्रसाद जवादेसह झळकणार ‘हे’ कलाकार
दरम्यान, आता भुवनेश्वरी अधिपतीची जन्मदाती आई नसल्याच्या सत्यावरून आणखी काय-काय घडतं? अक्षरा, चारुहास भुवनेश्वरीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर कसा आणतात? अधिपती पुढे काय करतो? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.