ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी पुण्यात राष्ट्रसेवा दलाच्या सभागृहात ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला जात असताना त्यांच्या गाडीवर भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ला केला, गाडीच्या काचा फोडून शाईफेक करण्यात आली. या हल्ल्यानंतर विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अशातच ‘बिग बॉस’ फेम अभिनेते किरण माने व एका मराठी अभिनेत्रीने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत या घटनेचा जाहीर निषेध केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री वीणा जामकरने यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. “सन्माननीय निखिल वागळे, चौधरी सर आणि असीम सरोदे यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध!!” असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. वीणाच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. याशिवाय ‘बिग बॉस’ फेम अभिनेते किरण माने यांनी देखील यासंदर्भात पोस्ट शेअर करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : “बाळंतपण नैसर्गिक की सिझेरियन?”, चाहतीच्या प्रश्नावर सई लोकूर म्हणाली, “स्त्रीरोगतज्ज्ञ अन्…”

किरण माने लिहितात, “सर्व काही लक्षात राहणार…दिवसा तोंडावर गोड गोड गोष्टी करायच्या…’एव्हरीथिंग इज वेल’ असं सांगायचं आणि रात्र होताच हक्क मागणाऱ्या लोकांवर लाठीचा वापर करायचा, गोळ्या झाडायच्या. आमच्यावर हल्ला करून, आम्हाला हल्लेखोर भासवून…सर्व काही आमच्या लक्षात राहील! निखिल वागळे यांचा खूप अभिमान आणि प्रेम – किरण माने.”

हेही वाचा : हातात सुवर्णपदक, माहेर अन् सासरची साथ…; मुग्धा वैशंपायनला मिळालं मोठं यश! पदव्युत्तर पदवी मिळाल्यानंतर म्हणाली…

दरम्यान, निखिल वागळेंनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांबाबत केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यामुळेच पोलिसांनी वागळेंना निर्भय बनो कार्यक्रमाला न जाण्याची विनंती केली होती. पण, निखिल वागळे कार्यक्रमाला जाण्यावर ठाम होते. याच पार्श्वभूमीवर सभा स्थळाच्या बाहेर आधीच भाजप कार्यकर्ते जमा झाले होते, घोषणाबाजीही करण्यात आली. त्यानंतर निखिल वागळे यांची गाडी कार्यक्रमस्थळी येताच त्या ठिकाणी गाडीची पुढची काच फोडण्यात आली, काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आडवे पडून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.

याशिवाय किरण माने व वीणा जामकरबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेते किरण मानेंनी नुकताच ठाकरे गटात प्रवेश करत आपल्या राजकीय प्रवासाला सुरूवात केली आहे. बिग बॉस मराठीमुळे ते घराघरांत लोकप्रिय झाले होते. तसेच वीणाने आजवर ‘लालबागची राणी’, ‘तुकाराम’, ‘आणीबाणी’ अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nikhil wagle attack case in pune kiran mane and veena jamkar shares angry post on social media sva 00