Bigg Boss Marathi Nikki And Arbaz : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वापासून निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांची जोडी प्रचंड चर्चेत आहे. शोमध्ये पहिल्याच आठवड्यात या दोघांच्या प्रेमाचे वारे वाहू लागले होते. यानंतर अरबाज शोमधून एलिमिनेट झाल्यावर निक्की प्रचंड रडल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. अनेक वाद होऊन त्यानंतर गैरसमज दूर झाल्यावर सध्या ही जोडी ‘बिग बॉस’ शो संपल्यावरही एकत्र फिरताना दिसते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निक्की-अरबाजने ( Nikki And Arbaz ) शो संपल्यावर एकदाही ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचं मान्य केलेलं नाही. पण, “अरबाज माझ्या आयुष्यात खूप खास आहे आणि तो मला कायम हवा आहे” असं निक्की अनेक मुलाखतींमध्ये बोलली आहे. अलीकडेच हे दोघंही कामानिमित्त तसेच एका प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी एकत्र मनालीला गेले होते. आता मुंबईत परतल्यावर हे दोघंही एकत्र शाहरुख खानचा रोमँटिक चित्रपट पाहण्यासाठी गेले होते.

हेही वाचा : भुवनेश्वरीने मास्तरीण बाईंना दिलं खास गिफ्ट! दोघींमध्ये आहे सुंदर नातं; शिवानी रांगोळे म्हणाली, “कविता ताई थँक्यू…”

निक्की-अरबाजने कोणता चित्रपट पाहिला?

शाहरुख खान, प्रीती झिंटा आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘कल हो ना हो’ हा चित्रपट १० मार्च २००३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सध्या जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची एक लाट आली आहे. गेल्या महिन्याभरात अनेक जुने चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यामुळे निर्मात्यांनी शाहरुखचा सुपरहिट ठरलेला ‘कल हो ना हो’ चित्रपट २१ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित करण्यात निर्णय घेतला.

१५ नोव्हेंबरपासून हा सिनेमा सर्वत्र पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे. हाच एव्हरग्रीन सिनेमा पाहण्यासाठी निक्की-अरबाज जोडीने गेले होते. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचा एक मित्र देखील होता. याच मित्राने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती आहे. निक्की-अरबाजने ( Nikki And Arbaz ) त्यांच्या अकाऊंटवरून ही स्टोरी रिशेअर केली आहे त्यामुळे या दोघांच्या Movie डेटच्या चर्चा आता रंगल्या आहेत.

हेही वाचा : Video : “तुरू तुरू चालू नको…”, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील पुड्या आणि राजश्रीचा जबरदस्त डान्स, सूर्यादादा म्हणाला…

निक्कीने चित्रपटगृहातील स्टोरी केली शेअर ( Bigg Boss Marathi Nikki And Arbaz )

दरम्यान, अरबाज-निक्की ( Nikki And Arbaz ) एकत्र असल्याने त्यांचे चाहते प्रचंड आनंदी आहेत. याशिवाय नुकतीच घन:श्यामने या दोघांची भेट घेतली. यावेळी छोट्या पुढारीने सुद्धा जाता-जाता अरबाजला ‘भाई’ ऐवजी ‘दाजी’ हाक मारली होती. यावेळी निक्की काहीशी लाजल्याचं पाहायला मिळालं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nikki and arbaz bigg boss marathi fame couple movie date both watch shah rukh khan re release movie sva 00