Nikki Tamboli : यंदा बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व निक्की तांबोळीने तुफान गाजवलं. घरात सर्वत्र तिचीच चर्चा असायची. घरात निक्कीची जवळपास प्रत्येक सदस्याशी भांडणं झाली. मात्र, या घरात काही झालं तरी कायम निक्कीच्या पाठीशी तिचा मित्र अरबाज पटेल उभा राहिल्याचं पाहायला मिळालं.

निक्की आणि अरबाज बिग बॉसच्या घरात कायम एकत्र दिसायचे. त्यांचे विचार एकमेकांशी जुळत होते आणि त्यांची केमेस्ट्री चाहत्यांना सुद्धा आवडत होती. अरबाज पटेलच्या आधीच्या रिलेशनमुळे निक्कीच्या आईने या दोघांच्या नात्याला विरोध केला होता. मात्र, बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावरही हे दोघे सोबत आहेत. नुकतेच दोघेही चंदीगढ आणि मनालीला एकत्र फिरायला गेले होते. या दोघांचे एकत्र प्रवास करतानाचे आणि एकमेकांबरोबर वेळ घालवतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
tharla tar mag arjun confess love for sayali at bus stand
ठरलं तर मग : अखेर तो क्षण आला! एसटी स्टँडवर जाहीर घोषणा करत अर्जुनने दिली प्रेमाची कबुली; म्हणाला, “मिसेस सायली…”
Video of couple kissing metro station platform
मेट्रो स्टेशनवर ‘किस’ करणाऱ्या जोडप्याचा ‘तो’ Video Viral; नेटकरी म्हणे, “यात गैर काय”
Video a brother cried for a bride sister on a wedding day
या दिवशी प्रत्येक भाऊ रडतो! बहिणीजवळ ढसा ढसा रडला; VIDEO पाहून व्हाल भावुक

हेही वाचा :Video : प्रिया बापटने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायलं गाणं; पती उमेशनेही केलं कौतुक; म्हणाली, “आठवणीत ठेवावी…”

निक्की व अरबाज रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र ते त्याबाबत थेट बोलणं टाळतात. एकमेकांवर ते प्रेम व्यक्त करत असतात. अनेक इव्हेंट्सना ते एकत्र हजेरी लावतात. त्यांचे फोटो व व्हिडीओही चर्चेत असतात. अशातच निक्कीला ती लग्न केव्हा करणार? असा प्रश्न विचारण्यात आला. याचं तिने उत्तर दिलं आहे.

विरल भयानी या इन्स्टाग्राम अकाउंटवर निक्कीचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये पापाराझींनी निक्कीला लग्न केव्हा करणार? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर निक्की काहीशी लाजली आणि हसतहसत तिने म्हटलं, “तुम्हाला सर्वांना नेहमी हा एकच प्रश्न मला विचारण्यासाठी मिळतो का?” त्यावर पापाराझी अरबाजचं नाव न घेता म्हणतात, “दोघीही एकत्र फार छान दिसता.” मात्र निक्की यावर काहीही न बोलता गोड स्माइल देऊन पुढे जाते.

हेही वाचा : बालकावरील उपचाराच्या नावाखाली साडेचार कोटींची फसवणूक, माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवरून नागरिकांना मदतीचे आवाहन

निक्कीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, तिने २०१९ मध्ये एका दाक्षिणात्य चित्रपटातून सिनेसृष्टीत एन्ट्री घेतली. ‘बिग बॉस’ हिंदीच्या १४ व्या पर्वातदेखील ती सहभागी झाली होती. या शोमध्ये निक्की सेकंड रनर अप झाली होती. ‘जोगीरा सारा रा रा’ चित्रपटात निक्कीने ‘कॉकटेल’ हे आयटम साँग केलं होतं. या गाण्यात ती अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकीबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसली.

Story img Loader