Nikki Tamboli- Arbaz Patel Bigg Boss Marathi 5: निक्की तांबोळीचे आई-बाबा या आठवड्यात बिग बॉसच्या घरात तिला भेटायला आले. यावेळी त्यांनी अभिजीतचं कौतुक केलं. निक्कीने केलेल्या अपमानाबद्दल तिची आई प्रमिला तांबोळी यांनी वर्षा उसगांवकर यांची माफी मागितली. घरातील सदस्यांशी गप्पा मारताना अरबाजचा विषय निघाला, त्यावर निक्कीच्या आईने अरबाजच्या आई-वडिलांना त्रास होतोय असं सांगितलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रमिला तांबोळी म्हणाल्या, “अरबाज गेल्यावर सर्वांना वाटलं की आता निक्की संपली, निक्कीचा गेम संपला, पण तू जे परत गेममध्ये आलीस ते पाहून छान वाटलं.” निक्की म्हणते, “मी शांत कसं बसू, तो स्वभाव नाही माझा. अरबाज माझ्यासाठी होता, पण तो सपोर्ट सिस्टिम नव्हता. आम्ही मित्र म्हणून सोबत खेळायचो. आम्ही वेगळे आलो आणि एकत्र खेळलो. आम्ही एकमेकांना पसंत करायचो. तो गेला तरी मी अजूनही आहे. वाईट वाटलं पण दुसऱ्या दिवशी मला माझ्याच पायावर उभं राहायचं होतं.”
निक्कीची आई म्हणाली की अभिजीत निक्की रागात असल्यावर खूप चांगल्या पद्धतीने शांत करतो. अरबाजही तसाच होता, त्यावर निक्की म्हणते तो रागीट होता खूप. त्यावर तू अभिजीतवर अरबाजइतकं नाही रागावलीस असं प्रमिला म्हणाल्या. त्यावर तोही रागवायचा असं निक्की म्हणाली. नाही तो एवढा नव्हता रागवत. बंधनात असताना तो माझ्याबद्दल खूप बोलला असेल ना? असं निक्कीने विचारल्यावर आई म्हणाली. खूप नाही, पण थोडंफार. हो मध्ये हो मिळवायचा.
Bigg Boss Marathi: “माझा साखरपुडा…”, निक्कीच्या आईच्या वक्तव्यावर अरबाज पटेलची पहिली प्रतिक्रिया
निक्कीच्या आईने सांगितली अरबाजच्या आईची प्रतिक्रिया
निक्की म्हणाली, “मला खात्री होती की तो माझाच आहे.” त्यावर आई म्हणते असं काही म्हणू नकोस. निक्की अॅज अ फ्रेंड म्हणाली. प्रमिला म्हणाल्या, “अॅज अ फ्रेंड ते ठिक आहे, पण तुमच्या अशा बोलण्याचा तिकडे त्याच्या आई-बाबावर फार वाईट परिणाम झाला. बाहेर लोकांच्या प्रतिक्रिया वेगळ्या असतात. त्याची आई तर आजारी पडली. त्याच्या बाबांचा एक व्हिडीओ पाहिला मी. त्याची आई म्हणाली की तो ऑलरेडी कमिटेड होता. त्याने सांगितलं होतं तरी मुली त्याच्यामागे लागतात. मी अशा किती मुलींना घरात घेऊ. तर मला वाईट वाटलं की त्या लोकांना पण खूप त्रास होतो. कुठल्या दोन शोमध्ये जाऊन आला तर दोन मुली ऑलरेडी त्याच्या मागे आल्या. आता तू तिसरी. आम्ही कुणाकुणाला घरात घ्यायचं.” त्यावर निक्की म्हणाली, अगं मला डिप्रेशन आलं. त्यावर तुला सोड मला किती आलं असेल असं निक्की म्हणाली.
तुझी अरबाजशी फक्त मैत्री आहे – प्रमिला तांबोळी
पुढे निक्की तिच्या आईला वेगळं नेते आणि त्याच्या आईचं काय असं विचारते. प्रमिला म्हणतात, “त्याची आई म्हणते की आम्हाला चांगलं वाटत नाही. सगळ्या नातेवाईकांमध्ये सगळे नाव ठेवतात. अरबाज चुकीचं चाललाय, त्याने असं करायला नको. त्याचं बाहेर रिलेशन आहे, त्यावर परिणाम होतोय. बिग बॉसच्या बाहेर त्याची लाइफ आहे. त्याची इंगेजमेंट झालेली आहे, असं म्हणतात. झालंय की ठरलंय. एका मुलीने म्हटलं की आमचं ब्रेकअप झालं. काय काय बातम्या पसरवतंय. मला काही माहीत नाही. त्याच्याशी मला काही घेणं-देणं नाही, मला माहितीये की तुझी फक्त मैत्री आहे.” यावर निक्की म्हणते त्याच्या कुटुंबावर याचा परिणाम व्हायला नको. यानंतर प्रमिला म्हणतात की आता तो बाहेर गेलाय त्यामुळे काही प्रश्नच उरलेला नाही.