Nikki Tamboli: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता रीलस्टार सूरज चव्हाण (Suraj Chavan) ठरला. या शोचा उपविजेता गायक अभिजीत सावंत सावंत होता. तर निक्की तांबोळी तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत निक्कीला सूरजच्या विजयाबद्दल विचारण्यात आलं, त्यावर तिने तिची मतं मांडली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूरज चव्हाण हा शो जिंकेल, असं वाटलं होतं का? असा प्रश्न निक्कीला विचारण्यात आला. “मला कल्पना नव्हती, पण जर चाहत्यांनी त्याला जिंकवलं तर ते स्वीकारण्यास नकार देणारी मी कोण आहे. कारण तुमच्या नशीबात जे असतं तेच तुम्हाला मिळतं. कदाचित माझ्या नशिबात ट्रॉफी नव्हती आणि त्याच्या नशिबात ट्रॉफी होती, माझ्या नशिबात खूप सारं प्रेम होतं ते मला मिळालं आणि त्यामुळे मी खूश आहे. माझा नशिबावर खूप विश्वास आहे, त्यामुळे मी कधीच निराश होत नाही. कारण देव जे तुमच्यासाठी करतो ते तुमच्यासाठी चांगलंच असतं,” असं निक्की लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

हेही वाचा – बॉलीवूड अभिनेत्रीने खरेदी केलं आलिशान घर, पतीबरोबर केला गृहप्रवेश, पाहा घराची झलक

पुढे निक्की म्हणाली, “मी अशा कमेंट्स वाचल्या की तो सहानुभूतीमुळे जिंकला. काय असतं ना.. मी ट्रॉफी उचलली असती तर माझ्या चाहत्यांनी माझा द्वेष केला असता. आता माझे चाहते त्याचा द्वेष करतात. हे असंच सुरू राहणार. त्यामुळे जे सत्य आहे ते स्वीकारून आयुष्यात पुढे जा.”

हेही वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्रीने खरेदी केलं नवीन घर! शेअर केले गृहप्रवेशाचे फोटो, होतोय कौतुकाचा वर्षाव

निक्कीला शोची ट्रॉफी जिंकल्याची खंत नाही. ती वर्षा उसगांवकरांशी ज्या पद्धतीने उद्धटपणे बोलली त्याची खंत असल्याचं तिने सांगितलं. घडलेल्या प्रकाराबद्दल मी तिथेच त्यांची माफी मागितली. मला शो चालवायचा होता, गाजवायचा होता, ते मी केलं, असं निक्की तांबोळीने नमूद केलं.

हेही वाचा – Video : आजी अन् नातवाचं प्रेम! ‘बर्थडे गर्ल’ म्हणत शिवने ‘असा’ साजरा केला लाडक्या आजीचा वाढदिवस, सर्वत्र होतंय कौतुक

यापूर्वी निक्कीने सूरजच्या विजयावर प्रतिक्रिया दिली होती. “सूरज विजेता होण्यासाठी खूप जास्त पात्र होता. पहिल्या दिवसापासून पाहायचं झाल्यास सूरज सर्वात वेगळा होता. आम्ही सगळेही स्वतंत्र खेळत होतो, मात्र सूरज हा सर्वांपेक्षा वेगळा होता. तो खरंच पात्र होता आणि आम्हाला वाटत होतं की तो जिंकेल. मी त्याच्यासाठी खूप खूश आहे. मी त्याला राखी बांधली आहे. तो ट्रॉफीचा खरा हकदार आहे,” असं निक्की म्हणाली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nikki tamboli on suraj chavan won bigg boss sympathy card varsha usgaonkar hrc