Bigg Boss Marathi Nikki Tamboli : यंदा हिंदी ‘बिस बॉस’ गाजवून आलेल्या निक्की तांबोळीने ‘बिस बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभाग घेतला. शोच्या पहिल्या दिवसापासून ती प्रचंड चर्चेत आहे. निक्की घरातल्या सगळ्या सदस्यांशी भांडून नेहमीच घरात मनमानी कारभार करत असल्याचं पाहायला मिळतं. यावरून रितेश देशमुखने सुद्धा तिची भाऊच्या धक्क्यावर अनेकदा शाळा घेतली आहे. याशिवाय, निक्कीची आणखी एका गोष्टीमुळे चर्चा होत असते ती म्हणजे, अरबाज. ‘बिग बॉस’ सुरू झाल्यावर पहिल्या दिवसापासून निक्की-अरबाजच्या मैत्रीच्या आणि जवळीकतेच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या.

दोघांमधल्या जवळीकतेवर अरबाजच्या कुटुंबीयांकडून देखील नाराजी व्यक्त करण्यात आली होती. याशिवाय अरबाज एलिमिनेट झाल्यावर निक्की प्रचंड रडल्याचं पाहायला मिळालं. मात्र, आधी सुद्धा एका शोमध्ये निक्कीचं एका व्यक्तीशी नाव जोडलं गेलं होतं. ती व्यक्ती कोण आहे जाणून घेऊयात…

निक्कीला गुडघ्यावर बसून केलेलं प्रपोज

‘बिस बॉस ओटीटी’ आणि ‘द खतरा-खतरा’ या दोन शोमुळे निक्कीचं ( Nikki Tamboli ) नाव प्रतीक सहजपालबरोबर जोडलं गेलं होतं. काही वर्षांपूर्वी ‘द खतरा-खतरा’ शोमध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. या शोमध्ये निक्की आणि प्रतिकची जोडी चांगलीच चर्चेत आली होती. या शोच्या एका टास्कमध्ये भारतीने निक्कीला, “तुला प्रतीकबरोबर डेटवर जायला आवडेल का?” असा प्रश्न विचारला. यावर निक्कीने “मला प्रतीकबरोबर लग्न करायचं आहे” असं उत्तर दिलं होतं. या टास्कमध्ये दोघांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळाली होती.

हेही वाचा : Video : “निक्कीला खूप चांगली कानाखाली…”, जयने केली Bigg Bossची नक्कल, आर्याची फिरकी घेत म्हणाला…; पाहा व्हिडी

Nikki Tamboli – निक्कीला प्रतीकने भर कार्यक्रमात केलं होतं प्रपोज ( फोटो सौजन्य : कलर्स वाहिनी )

‘द खतरा-खतरा’मध्ये प्रतीकने निक्कीला ( Nikki Tamboli ) गुडघ्यावर बसून गुलाब देत प्रपोज केलं होतं. याशिवाय प्रतीक ‘बिग बॉस ओटीटी’च्या पहिल्या पर्वात सहभागी झाला होता. या सीझनमध्ये निक्कीने पाहुणी सदस्य म्हणून रुबिना दिलैकबरोबर घरात प्रवेश केला होता. यावेळी लॉकडाऊनचा काळ नुकताच संपल्याने निक्की आणि रुबिनाला एका काचेमागे उभं करण्यात आलं होतं.

निक्कीने यादरम्यान, प्रतीकला हाक मारून वैयक्तिक काहीतरी बोलायचंय आहे असं सांगत जवळ बोलावलं. निक्कीने त्याला गाल समोर कर सांगून किस केलं होतं. यानंतर प्रतीकने देखील निक्कीला भर कार्यक्रमात किस केलं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन निक्की-प्रतीकच्या डेटिंगच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. याशिवाय ‘बिग बॉस ओटीटी’च्या घराचा निरोप घेताना “मी तुझी बाहेर वाट बघतेय, जिंकून ये” असं देखील निक्कीने प्रतीकला सांगतिलं होतं.

हेही वाचा : Video : मालक अन् सांगकाम्या! Bigg Boss ने टास्क जाहीर करताच निक्कीने थेट जोडले हात; तर जान्हवीने…; पाहा व्हिडीओ

दरम्यान, सध्या ‘बिग बॉस मराठी’मुळे निक्की ( Nikki Tamboli ) चांगलीच चर्चेत आहे. अरबाज बाहेर झाल्यावर ती प्रचंड भावुक झाली होती. अनेकांनी निक्की-अरबाजची मैत्री फक्त शोसाठी आहे असं देखील म्हटलं आहे. यामुळेच निक्की आणि प्रतीकचे जुन्या शोचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहेत.