Nikki Tamboli Arbaz Patel: ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे (Bigg Boss Marathi 5) पर्व स्पर्धकांच्या भांडणांमुळे आणि टीआरपीमुळे गाजलेच, पण त्याचबरोबर अरबाज पटेल व निक्की तांबोळी यांच्या नात्याचीही या घरात चांगलीच चर्चा झाली. अरबाज पटेल कमिटेड होता, मात्र बिग बॉसमध्ये गेल्यावर त्याच्यात व निक्कीमध्ये जवळीक वाढली. अरबाज एलिमिनेट झाल्यावर निक्की खूप रडली होती. त्यानंतर फॅमिली स्पेशल वीकमध्ये निक्कीच्या आईने घरात आल्यावर अरबाजचा साखरपुडा झालाय, असं सांगितलं आणि चांगलाच गोंधळ झाला होता.

अरबाजने निक्कीच्या आईने केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं होतं. कमिटेड होतो, साखरपुडा किंवा लग्न झालं नव्हतं, असं तो म्हणाला होता. अरबाज जिच्याशी कमिटेड होता तिचं नाव लीझा बिंद्रा आहे. लीझा व अरबाजच्या अकाउंटवर एकमेकांबरोबरचे अनेक रोमँटिक फोटो होते, अरबाज व निक्कीची जवळीक वाढत असताना लीझाने काही पोस्टदेखील केल्या होत्या, नंतर तिने सोशल मीडियाला रामराम ठोकला. निक्कीला तिच्या आईने जे सांगितलं होतं त्यानंतर ती खूप चिडली होती. दुसरीकडे यानंतर अरबाजने लीझाशी ब्रेकअप केल्याचं सांगितलं. फिनालेआधीच्या एपिसोडमध्ये घरातील एलिमिनेटेड सदस्य परत आले आणि त्या रियूनियनमध्ये अरबाजने निक्कीची मनधरणी केली. त्यानंतर शो संपल्यावरही निक्की व अरबाज एकत्र दिसत आहेत.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
why Shatrughan Sinha married Poonam despite his affair with Reena Roy
रीना रॉयबरोबर अफेअर असूनही पूनमशी लग्न का केलं? शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले, “निर्णय घेणं…”
Anurag Kashyap Daughter Haldi Ceremony
वयाच्या २३ व्या वर्षी अनुराग कश्यपची लेक अडकणार विवाहबंधनात! हळदीला सुरुवात, होणारा जावई कोण?

हेही वाचा – ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे, काय करतो? अंकिता वालावलकरच्या होणाऱ्या पतीबद्दल जाणून घ्या

अरबाज पटेल ‘स्प्लिट्सव्हिला’मध्ये झळकला होता, त्या शोमधील त्याची पार्टनर नायराने त्याच्यावर आरोप केले होते. त्याचा खेळ मुलींभोवती फिरतो, लीझा गरोदर आहे, अरबाज तिच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे, अशी वक्तव्ये तिने केली होती. या सर्व गोष्टींवर पहिल्यांदाच निक्कीने प्रतिक्रिया दिली आहे. ज्याच्या प्रेमात असता तुम्ही तो आता तुमच्याबरोबर नाही म्हणून त्याच्याबद्दल वाटेल ते लोक बोलतात तर ते खरंच प्रेम आहे का, असं निक्की म्हणाली. तसेच अरबाजने माझ्या आई-वडिलांना त्याच्या नात्याबद्दल सगळं स्पष्टीकरण दिलं. त्याने त्याचं आधीचं नातं संपवलं होतं आणि पुन्हा भेटल्यावर सगळं समजावून सांगितलं, असं निक्की म्हणाली.

हेही वाचा – Video: “तू माझी हिरोईन आहेस”, सूरज चव्हाणला भेटायली आली ‘ती’; नेटकरी म्हणाले, “हीच आमची वहिनी शोभेल”

लीझाबद्दलच्या थेट प्रश्नावर निक्की म्हणाली…

तू अरबाजला लीझाबद्दल विचारलंस का? असा प्रश्न निक्कीला टेली मसालाच्या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर तिने काय उत्तर दिलं ते पाहुयात. “मी कोणाचे नाव घेणार नाही, मला त्या दोघांपैकी कुणालाही कमकुवत दाखवायचं नाही. ते दोघेही स्ट्राँग आहेत, मात्र त्यांनी आपापल्या आयुष्यात खूश राहावं. कोणाला अपमानित करू नका, तो मुलगा आता तुमच्याबरोबर नाही त्याचा अर्थ तुम्ही त्याचा अपमान कराल असं नाही. एकच आयुष्य आहे. त्यामुळे मला वाटतं की इथे जर तुम्ही लोकांना खरं-खोटं सांगायचा प्रयत्न कराल तर देवाघरी गेल्यावर देवाने तुमच्या नावावर तुमचे कर्म लिहिले असतील. त्यामुळे स्वर्गात जायचं की नरकात ते देवाला ठरवू द्या. तुम्ही इथे कॅमेऱ्यासमोर का वाईट बनताय, तुमचं जे काही आहे ते तुमच्याजवळ ठेवा,” असं निक्की तांबोळी म्हणाली.

Story img Loader