Celebrity MasterChef Finale Week: ‘सोनी टीव्ही’ वाहिनीवरील ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ हा कुकिंग शो लवकरच प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहे. सध्या या शोमध्ये फिनाले वीक सुरू आहे. ११ एप्रिलला ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. निक्की तांबोळी, तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना, राजीव अडातिया, फैजल शेख या पाच जणांमधील एकजण ‘सेलिब्रिटी मास्टर’चा विजेता होणार आहे. पण त्याआधी या पाच जणांना आव्हानात्मक टास्क दिले जात आहेत. तसंच या फिनाले वीकमध्ये खास पाहुण्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. अशातच निक्की तांबोळीला बॉयफ्रेंड अरबाज पटेलने दिलेल्या खास वस्तुचा खुलासा झाला आहे.

नुकत्याच झालेल्या भागात अभिनेता चंकी पांडे खास पाहुणा म्हणून उपस्थित राहिला होता. यावेळी स्पर्धकांना ५५ मिनिटांत पदार्थ बनवायचा होता. यादरम्यान चंकी पांडे सर्व स्पर्धकांच्या काउंटरवर जाऊन त्यांचं लक्ष दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा चंकी निक्कीच्या काउंटरवर गेला तेव्हा म्हणाला, “निक्की तांबोळी तू मेरेसे कितना कम बोली.” यावेळी निक्की पदार्थ बनवण्यात व्यग्र होती. पण, तिने पदार्थ बनवत चंकी पांडेला उत्तर दिलं. निक्की म्हणाली, “तुमच्या नादात माझे तांदूळ जळतील.” यावर चंकी पांडे मजेत म्हणाला की, जळतील तुझे शत्रू.

त्यानंतर परीक्षक फराह खानला निक्कीच्या किचनवर कॉफीचा कप दिसला. ज्यावर निक्की आणि अरबाजचे फोटो होते. हे पाहून फराह म्हणाली, “अरे बापरे. हे तर आम्ही पाहिलंच नव्हतं. खूप गोड आहे.” तेव्हा निक्कीने अरबाजने दिलेल्या कॉफी कपबाबत सांगितलं. ती म्हणाली, “गेल्या दोन दिवसांपासून माझ्याकडून चांगले पदार्थ होतं नव्हते. म्हणून त्याने प्रोत्साहन देण्यासाठी कॉफीचा कप दिला. तो येऊ शकला नाही, पण त्याने हा कप पाठवला.” योगायोगाने यावेळी निक्कीने बनवलेला पदार्थ परीक्षकांना आवडला आणि तिला स्पून टॅप देखील मिळाला.

अरबाज पटेलने निक्की दिलेला खास कॉफी मग
अरबाज पटेलने निक्की दिलेला खास कॉफी मग

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘सेलिब्रिटी मास्टरशे’फच्या सेमी फिनालेमधून अर्चना गौतमची एक्झिट झाली. ती जाता-जाता म्हणाली होती, “मी या कार्यक्रमात वडिलांसाठी आली होती. तुम्ही आणि या कार्यक्रमाने माझ्या वडिलांचा विचार बदलला. गेल्या २० वर्षांपासून माझे बाबा एका शब्दाला खूप सामोरे जात होते. माझे आजोबा इतके टोमणे मारायचे की, माझा जावई कूक आहे. आता मी बाबांना विचारते, काही समस्या नाही ना? तर बाबा म्हणतात, तू ये. मी तुला चिकन बनवून खायला घालेन.” त्यानंतर रणवीर बरार म्हणाला की, कूकची मुलगी असणं यापेक्षा काही सुंदर गोष्ट नाहीये. गौतमजी तुमची मुलगी हिरा आहे.