Bigg Boss Marathi 5 मध्ये सर्वांत गाजलेली जोडी म्हणजे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल ही होय. बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलच्या जवळीकीची मोठी चर्चा झाली. गेमसाठी ते एकमेकांचा वापर करीत असल्याचे म्हटले गेले. अनेकांना बिग बॉसच्या घराबाहेर त्यांचे नाते असणार आहे का, असाही प्रश्न पडला होता. आता बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर या दोघांचा एक व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

निक्की आणि अरबाजने शेअर केला व्हिडीओ

निक्की तांबोळीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करीत म्हटले, “फायनली मला माझा स्वत:(Me time…)चा वेळ मिळाला आहे आणि माझ्या मी टाइम (Me time…)मध्ये स्वागत आहे अरबाजचं.” याआधीदेखील निक्कीने सोशल मीडियावर अरबाजबरोबरचा फोटो शेअर केला होता.

बिग बॉसच्या घरात दोन ग्रुप तयार झाले होते. त्यातील ए ग्रुपमध्ये निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण व अरबाज पटेल हे सदस्य होते. काही काळानंतर या ग्रुपमध्ये भांडणे झाली आणि त्यांच्यात फूट पडली. अरबाज आणि निक्कीमध्येदेखील मोठे भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, त्यानंतर ते पुन्हा एकत्र आले. त्यावेळी त्यांच्या जवळीकीची मोठी चर्चा झाली. कारण- अरबाजने बिग बॉसच्या घरातच तो बाहेर ‘कमिटेड’ असल्याचे म्हटले होते.

इन्स्टाग्राम

अरबाज पटेल बिग बॉसमध्ये सहभागी होण्याआधी ‘स्पिलट्सव्हिला १५’मध्ये सहभागी झाला होता. त्या शोमध्ये त्याची पार्टनर असलेल्या नायराने त्याच्यावर काही आरोप केले होते. अरबाज शोसाठी मुलींचा वापर करतो, असे तिने म्हटले होते. जेव्हा तो ‘स्पिलट्सव्हिला १५’मध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने मला त्याची गर्लफ्रेंड असल्याचे सांगितले नव्हते, असे म्हटले होते. हे सगळे आरोप खोटे असल्याचे अरबाजने आपल्या मुलाखतीत म्हटले आहे.

याबरोबरच अरबाजचा त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर साखरपुडा झाला आहे, असेही म्हटले जात होते. त्यामुळे निक्कीबरोबरची त्याची जवळीक पाहून त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले होते.

हेही वाचा: “ज्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही निशाणे…”, धनंजय पोवार बी ग्रुपबद्दल काय म्हणाला?

अरबाज ‘बिग बॉस मराठी’च्या बाहेर गेल्यानंतर जेव्हा निक्कीची आई घरात आली होती, तेव्हा तिने अरबाजचा साखरपुडा झाल्याचे बोलले जात आहे, असे सांगितले होते. त्यानंतर निक्की नाराज दिसत होती. मात्र, अरबाजने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पुन्हा जाण्याची संधी मिळाल्यानंतर तिचे गैरसमज दूर केले होते.

आता ‘बिग बॉस मराठी’नंतर निक्की आणि अरबाजच्या करिअरची पुढची वाटचाल कशी असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.