Nikki Tamboli tied Rakhi to Suraj Chavan: ‘बिग बॉस मराठी’मध्ये रक्षाबंधन हा भावा-बहिणीच्या नात्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी घरात सगळ्यांची भांडणं करून चर्चेत राहणाऱ्या निक्की तांबोळीने सूरज चव्हाणला राखी बांधली. राखी बांधताना निक्कीने जिवंत असेपर्यंत सूरजचे रक्षण करणार असल्याचं म्हटलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये निक्की सूरज चव्हाणला राखी बांधताना दिसत आहे. राखी बांधताना निक्कीने सूरजला म्हटलं की तुला केव्हाही गरज पडली, आठवण आली की तू मला फोन कर. मी शूटिंगमध्ये असेन तरीही तिथून पळत तुझ्या मदतीसाठी येईल.
बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये निक्की म्हणाली, “मला एवढंच म्हणायचं आहे की या घरात जेवढे दिवस आपण दोघे आहोत, तेवढे दिवस आणि मी तुला वचन देते की बाहेरच्या जगातसुद्धा मी तुझी रक्षा करेन.” यावर सूरज म्हणतो, “मीही तुझी बाहेरच्या जगात रक्षा करेन.”
पुढे निक्की म्हणाली, “जेव्हापर्यंत तू जिवंत आहेस, मी जिवंत असेन तुला कोणत्याही गोष्टीची गरज लागली, खरंतर तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही पण तरीही तुला माझी आठवण आली तर मला एक फोन करायचा. अर्ध्या रात्री, कधीही, मी पळत येईन. कुठल्याही शूटिंगमध्ये मी असेन तरीही मी पळत येईन. आय लव्ह यू”, असं म्हणत निक्कीने सूरजला राखी बांधली व मिठी मारली. नेहमी खूश राहा असंही ती सूरजला म्हणाली.
बिग बॉसच्या या प्रोमोमध्ये कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकर धनंजय पवारला राखी बांधताना दिसत आहे. या व्हिडीओवर कमेंट्स करून नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. ‘खोटारडी,’ ‘राखी बांधून जवळ केली तरी आम्ही सूरजलाच सपोर्ट करणार’, ‘सूरज ती तुझ्याशी खूप खोटं बोलत आहे, त्या राखीचा अपमान करत आहे एवढं खोटं बोलत आहे, सूरज तू खूप भोळा आहेस, सांभाळून रहा ह्या खोट्या बहिणीपासून,’ ‘सूरजला लोकांचा सपोर्ट आहे हे माहीत आहे म्हणून नाटक करते’, ‘सूरजबरोबर गेम नको खेळूस निक्की’, ‘पक्की शहाणी आहे ही,’ ‘अरबाजला राखी बांधली का?’ अशा कमेंट्स यावर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
‘बिग बॉस मराठी’ हा शो दररोज रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होतो. तसेच तुम्ही जिओ सिनेमावरही हा शो पाहू शकता.