‘चला हवा येऊ द्या’नंतर आता डॉ. निलेश साबळेंचा नवा विनोदी कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ असं या नव्या विनोदी कार्यक्रमाचं नाव असून २७ एप्रिलपासून हा कार्यक्रम सुरू होत आहे. शनिवार, रविवार रात्री ९ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. नुकतंच या नव्या कार्यक्रमाचं शीर्षकगीत प्रदर्शित झालं आहे.
‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या नव्या कार्यक्रमाचं लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार आहेत. यामध्ये भाऊ कदम, ओंकार भोजनेसह सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदी कलाकार पाहायला मिळणार आहेत.
हेही वाचा – ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतून सुरेखा कुडचींची झाली एक्झिट, भावुक पोस्ट करत म्हणाल्या, “‘देवयानी’पासून…”
विशेष म्हणजे ‘हसताय ना ?हसायलाच पाहिजे!’ कार्यक्रमात महाराष्ट्राचे विनोदाचे बादशहा, अत्यंत संवेदनशील गुणी अभिनेते भरत जाधव आणि चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल-आठल्ये हे दोन महान कलाकार दर भागामध्ये सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी लाभणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा सुरू आहे. अशातच ‘हसताय ना ?हसायलाच पाहिजे!’चं जबरदस्त शीर्षकगीत समोर आलं आहे. ‘कलर्स मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शीर्षकगीताचा व्हिडीओ शेअर करण्यात आाला आहे.
दरम्यान, सुरुवातीला ‘हसताय ना ?हसायलाच पाहिजे!’ कार्यक्रमाची सुरू होण्याची तारीख २२ एप्रिल होती. पण त्यानंतर तारखेत बदल करण्यात आला. आता २७ एप्रिलपासून निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे तीन विनोदाचे हुकमी एक्के एकत्र येऊन पुन्हा एकदा नव्या जोशात नव्या जल्लोषात विनोदाची चौफेर आतषबाजी करणार आहेत.