‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांना १० वर्षं खळखळून हसवलं. गेल्या महिन्यात या कॉमेडी शोने चाहत्यांचा निरोप घेतला. हा विनोदी कार्यक्रम बंद होण्यामागे अनेक कारणं होती. या कार्यक्रमाचा लेखक, दिग्दर्शक निलेश साबळेने ती कारणं अनेकदा माध्यमांसमोर मांडली आहेत. परंतु, गेल्याच महिन्यात बंद झालेला हा कार्यक्रम लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निलेश साबळे यानं एका मुलाखतीत त्याबाबतचा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा निलेश साबळेला सागर कारंडेबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा निलेश म्हणाला, “जेव्हा हवा येऊ द्या सुरू होतं, तेव्हा सागर बाहेर पडला; त्याची वेगळी कारणं होती. सागरला बाहेर पडून दोन वर्षं झाली. तो स्वत:हून बाहेर पडला होता आणि त्यानंतर तो नाटक करत होता. जेवढं मला माहीत आहे, त्यानुसार अजूनही त्याची दोन नाटकं चालू आहेत आणि आता सध्या तो सिनेमा करतोय.”

हेही वाचा… स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”

निलेश पुढे म्हणाला, “चला हवा येऊ द्या अजूनही बंद नाही झालेलं. ‘झी’कडे जी उरलेली टीम आहे, त्या सगळ्यांना घेऊन, कदाचित ‘चला हवा येऊ द्या’ हे येऊही शकतं. त्या टीममध्ये तुम्हाला सागर कारंडे निश्चित दिसेल.”

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, श्रेया बुगडे, स्नेहल शिदम, अंकुर वाढवे असे तगडे हास्यसम्राट होते. हा कार्यक्रम बंद झाल्यानंतर कुशलने हिंदी कॉमेडी शोची वाट धरली. ‘मॅडनेस मचायेंगे’ या हिंदी भाषिक विनोदी कार्यक्रमात कुशलने एन्ट्री मारलीय. कुशलबरोबर या कार्यक्रमात मराठमोळी हेमांगी कवीदेखील सामील झालीय.

हेही वाचा… “तात्या विंचू पुन्हा येतोय!”, आदिनाथ कोठारेने शेअर केलं नव्या सिनेमाचं पोस्टर, अभिनेता म्हणाला…

तर निलेश साबळे, भाऊ कदम, ओंकार भोजने, स्नेहल शिदम व सुपर्णा श्याम हे कलाकार नव्यानं प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. कलर्स मराठी या वाहिनीवरील ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या विनोदी कार्यक्रमात या कलाकारांनी प्रेक्षकांच मनोरंजन करायला सुरुवात केलीय.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilesh sable said chala hawa yeu dya will come back soon with sagar karande in it dvr
Show comments