मराठी मालिका नेहमी चर्चेत असतात. नवनवीन ट्विस्ट आणि नव्या कलाकारांची एन्ट्री यामुळे मालिकांनी प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. तसेच नव्या मालिका आणि नवे कार्यक्रम देखील प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत आणि येत आहेत. अशातच दिवंगत अभिनेते निळू फुले यांची लेक म्हणजे अभिनेत्री गार्गी फुले थत्ते यांची लवकरच ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत दमदार एन्ट्री पाहायला मिळणार आहे. याचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री गार्गी फुले थत्ते ‘तुला पाहते रे’ मालिकेतून घराघरात पोहोचल्या. या मालिकेत त्यांनी साकारलेली ईशाची आई म्हणजेच पुष्पा निमकर चांगलीच गाजली होती. त्यानंतर गार्गी ‘राजा राणीची गं जोडी’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ आणि हिंदी मालिकांमध्ये झळकल्या होत्या. आता त्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत त्यांची एन्ट्री झाली आहे.

हेही वाचा – Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने बायकोला दिलं खास सरप्राइज; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “तुझ्या…”

‘स्टार प्रवाह’वरील ही लोकप्रिय मालिका म्हणजे ‘शुभविवाह’. मधुरा देशपांडे, यशोमन आपटे, विशाखा सुभेदार, कुंजिका काळविंट, अभिजीत श्वेतचंद्र अशी जबरदस्त कलाकार मंडळी असलेल्या ‘शुभविवाह’ मालिकेत गार्गी फुले थत्ते यांची एन्ट्री झाली आहे.

‘सीरियल जत्रा’ या इन्टाग्राम पेजवर ‘शुभविवाह’ मालिकेच्या पुढील भागात काय होणार? याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये गार्गी यांची झळक पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत, अलिशान घर सोडून आलेले आकाश आणि भूमी घर शोधताना दिसत आहेत. यावेळी ते सावित्री मनोहर शिंदे यांच्या घराची बेल वाजवतात. तेव्हा सावित्री शिंदे दार उघडतात. मग भूमी म्हणते, “आम्हाला घराची खूप गरज आहे.” त्यानंतर सावित्री म्हणतात, “घर वगैरे काही मिळणार नाही..निघा..चला…” भूमी म्हणते, “आता तुम्हीच सांगा इतक्या रात्री मी याला घेऊन कुठे जाऊ?” त्यावर सावित्री म्हणतात, “तू तर अजिबात बोलू नको माझ्याशी…आगाऊ मुली डोक्यात जातात माझ्या…हा…उपाशी मेले तरी चालेलं पण घर तुम्हाला देणार नाही…”

दरम्यान, ‘शुभविवाह’मध्ये गार्गी फुले यांची एन्ट्री झाल्यामुळे मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. त्यांनी साकारलेली सावित्री मनोहर शिंदे नेमकी कोण आहे? आणि त्या आकाश-भूमीला आसरा देण्यासाठी का नकार देतात? हे आता मालिकेतील येत्या भागात स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilu phule daughter gargi phule thatte entry in shubhvivah marathi serial pps