सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या मालिकेतून काही नवे चेहरे पाहायला मिळत आहेत. शिवाय नव्या मालिकेत हिंदीतील लोकप्रिय कलाकार देखील झळकताना दिसत आहेत. नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या एका नव्या मालिकेत ज्येष्ठ दिवंगत अभिनेते निळू फुले यांची मुलगी म्हणजे अभिनेत्री गार्गी फुले थत्ते पाहायला मिळणार आहेत.

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेतून अभिनेत्री गार्गी फुले थत्ते या घराघरात पोहोचल्या. या मालिकेतील त्यांनी साकारलेली ईशाची आई म्हणजेच पुष्पा निमकर ही भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतर गार्गी ‘राजा राणीची गं जोडी’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या लोकप्रिय मालिकांमध्ये पाहायला मिळाल्या. याशिवाय त्या हिंदी मालिकांमध्ये झळकल्या. आता गार्गी फुले थत्ते नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत.

tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
NG Acharya Udyan, Butterfly Festival, Mumbai,
मुंबई : एन. जी. आचार्य उद्यानात फुलपाखरू महोत्सवाला सुरुवात
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
Premachi Goshta actress Swarda Thigale react on troller
“रिप्लेसमेंटवाल्या भूमिका कलाकारांनी घेऊ नये…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील बदलावर युजरची प्रतिक्रिया; नवी मुक्ता म्हणाली, “आजही कलेचे…”
ananya pandey marriage plans
अनन्या पांडे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट? अभिनेत्री लग्नाचे प्लॅन्स शेअर करत म्हणाली, “पुढील पाच वर्षांत…”
Marathi Actress Samruddhi Kelkar social media post
हातात हिरवा चुडा, मेहंदी अन्…; ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम समृद्धी केळकरची लक्षवेधी पोस्ट; म्हणाली, “लवकरच…”
Parn Pethe
‘जिलबी’मध्ये पर्ण पेठे दिसणार खास भूमिकेत; चित्रपटाला होकार देण्याचे कारण सांगत म्हणाली…

हेही वाचा – Video: लांबच्या प्रवासाचा कंटाळा आल्यावर अंशुमन विचारेचं कुटुंब काय करतं? तुम्हीच पाहा ‘हा’ व्हिडीओ

अलीकडेच गार्गी या ‘स्टार प्रवाह’वरील ही लोकप्रिय ‘शुभविवाह’ मालिकेत झळकल्या होत्या. आता त्यांना ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ या नव्या मालिकेत पाहता येणार आहे. यासंदर्भात त्यांनी स्वतःचं पोस्ट केली आहे. या मालिकेतील इंदूसह फोटो शेअर करत गार्गी म्हणाल्या, “संध्याकाळी ७ वाजता ‘कलर्स मराठी’वर पाहायला विसरू नका…छोटी पण छान भूमिका माझीही आहे. तेव्हा जरूर बघा आमच्या इंद्रायणीला.”

हेही वाचा – “एका सावरकर भक्तासाठी…”, मुग्धा वैशंपायनची ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटावर प्रतिक्रिया, म्हणाली…

दरम्यान, ‘इंद्रायणी’ ही नवी मालिका २५ मार्चपासून सुरू झाली आहे. या मालिकेत इंदू ही प्रमुख भूमिका बालकलाकार सांची भोईर हिने साकारली आहे. याशिवाय अभिनेत्री अनिता दाते, संदीप पाठक, स्वानंद बर्वे, आयुष उलगड्डे, राघव घाडगे हे महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

Story img Loader