ज्येष्ठ दिवंगत अभिनेते निळू फुले यांची लेक अभिनेत्री गार्गी फुले-थत्ते वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन अभिनय क्षेत्रात काम करत आहेत. वेगवेगळ्या मालिकेत त्या दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी गार्गी ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिका ‘शुभविवाह’मध्ये झळकल्या होत्या. त्यानंतर आता त्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील नवीन मालिका ‘इंद्रायणी’मध्ये पाहायला मिळत आहे. अशातच गार्गी यांचे पती व निळू फुलेंचे जावई यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गार्गी फुले-थत्ते सध्या काम करत असलेल्या ‘इंद्रायणी’ या नव्या मालिकेत त्यांचे पती झळकले आहेत. ओंकार थत्ते असं त्यांचं नाव असून ‘कलर्स मराठी’च्या या नव्या मालिकेत त्यांनी व्यंकू महाराजांची भूमिका साकारली आहे.

हेही वाचा – निलेश साबळे, भाऊ कदम अन् ओंकार भोजने येणार एकत्र, महाराष्ट्राला खळखळून हसवणार; कधी, कुठे जाणून घ्या…

याआधी ओंकार थत्ते यांनी चित्रपटात काम केलं होतं. ‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटात निळू फुलेंचे जावई झळकले होते. याशिवाय त्यांनी एका जाहिरात मध्येही काम केलं होतं.

हेही वाचा – “व्हिलचेअरवर ऑक्सिजनचा पाइप लावून विजय चव्हाणांना बसलेलं पाहून धर्मेंद्र यांनी…”, वरद चव्हाणने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाला…

दरम्यान, निळू फुलेंची मुलगी गार्गी व ओंकार थत्ते यांचं लग्न २००७मध्ये झालं होतं. दोघांना एक मुलगा असून त्याचं नाव अनय आहे. गार्गी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्या ‘तुला पाहते रे’ मालिकेतून घराघरात पोहोचल्या. या मालिकेत त्यांनी साकारलेली ईशाची आई म्हणजेच पुष्पा निमकर चांगलीच गाजली होती. त्यानंतर गार्गी ‘राजा राणीची गं जोडी’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ आणि हिंदी मालिकांमध्ये झळकल्या होत्या.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilu phule son in law omkar thatte play role in indrayani new serial pps