बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन मागील काही महिन्यांपासून कौटुंबिक वादांमुळे चर्चेत आला आहे. राजीव आणि त्याची चारु असोपा यांच्यामध्ये झालेला वाद आतापर्यंत सर्वांना माहीत झाला आहे. या दापंत्याने माध्यमांसमोर एकमेकांच्या विरोधामध्ये वक्तव्य केले आहे. राजीवने चारुवर ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता करण मेहराशी अफेअर असल्यांचा आरोप केला होता. या आरोपामुळे हे प्रकरण आणखी तापले आहे.
चारु असोपा टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. तिने बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे. एका कार्यक्रमामध्ये ती आणि करण मेहरा मुख्य अतिथी म्हणून हजर होते. आयोजकांच्या म्हणण्याप्रमाणे तिने या कार्यक्रमामधला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यावर तिने करणलाही टॅग केले होते. या व्हिडीओचा आधार घेत राजीवने तिच्यावर परपुरुषासह संबंध ठेवत असल्याचे आरोप केले होते.
आणखी वाचा – चाहत्यांच्या गर्दीतून दिशाला सुखरूप नेणारी व्यक्ती आहे तरी कोण? नेटकरी म्हणाले “हा तर…”
करण मेहरानेही या आरोपांचे खंडन करत त्याच्यावर टीका केली आहे. त्याने ‘राजीववर मानहानीचा खटला भरवणार आहे’, असेही वक्तव्य केले होते. एकूण परिस्थितीवर करणच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने, निशा रावलनेही भाष्य केले आहे. ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने “सॉरी. मला यावर काहीही बोलायचं नाहीये”, असे म्हटले. पुढे दुसऱ्या एका मुद्द्यावर बोलताना तिने “मला यामध्ये पडायचं नाहीये. गेल्या काही दिवसांपासून मी माझ्याच अडचणींचा सामना करत आहे”, असे वक्तव्य केले.
२०१२ मध्ये करण मेहरा आणि निशा रावल यांनी लग्न केले होते. मागच्या वर्षी त्यांचा घटस्फोट झाला. निशाने त्याच्यावर घरगुती हिंसाचार केल्याचे आणि दुसऱ्या बाईची अनैतिक संबंध ठेवल्याचे आरोप केले होते. तिचे हे आरोप खोटे असल्याचे करणने माध्यमांना सांगितले होते. तेव्हा त्यानेही निशावर वेगवेगळे आरोप करत स्वत:ची बाजू मांडली होती.