छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता नितेश पांडे यांचं निधन झालं आहे. कार्डिअॅक अरेस्टमुळे ५१व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. नितेश पांडे यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनावर सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला आहे.
नितेश पांडे हे नाशिक येथील इगतपुरीमध्ये शूटिंगसाठी गेले होते. तिथेच कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं होतं? याची माहिती नाशिक पोलिसांनी दिली आहे. एबीपीने दिलेल्या माहितीनुसार, नितेश पांडे हे इगतपुरीमधील हॉटेल ड्यू ड्रॉप येथे थांबले होते. मंगळवारी(२४ मे) संध्याकाळी त्यांनी जेवणाची ऑर्डरही दिली होती.
हेही वाचा>> नितेश पांडेंच्या निधनानंतर मृणाल कुलकर्णी भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाल्या…
नितेश पांडेंनी दिलेल्या जेवणाची ऑर्डर देण्यासाठी आलेल्या हॉटेल स्टाफने त्यांच्या रुमची बेल वाजवली. पण बराच वेळ आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे मास्टर चावीच्या सहाय्याने नितेश पांडेंच्या हॉटेल रुमचा दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी नितेश पांडे बेशुद्ध अवस्थेत आढळले. रात्री २ वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
नितेश पांडेंच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. नितेश यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘अनुपमा’ या मालिकेत ते शेवटचे दिसले होते. ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका लक्षवेधी ठरली होती. याशिवाय ‘दबंग २’, ‘खोसला का घोसला’ या चित्रपटांतही त्यांनी काम केलं आहे.