नीती टेलर ही टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती ‘बडे अच्छे लगते हैं २’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिने आतापर्यंत अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. नीती पहिल्यांदाच तिच्या बालपणाबद्दल बोलली आहे. तिने तिला लहानपणी असलेल्या आजाराबद्दल व त्याचा तिच्या जीवनावर झालेल्या परिणामाबाबत खुलासा केला. लहानपणी नीतीच्या हृदयात छिद्र होतं.

“मी तिला खूप वेळा गमावणार होते”; लेक मालतीबद्दल प्रियांका चोप्राचा खुलासा, म्हणाली, “ती १०० दिवस…”

Hritik Roshan And Rajnikant
“मला जे वाटेल, ते मी…”, जेव्हा हृतिक रोशनच्या चुकीची रजनीकांत यांनी घेतलेली जबाबदारी; अभिनेत्याने आठवण सांगत म्हटलेले, “त्यांनी माफ…”
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
kartik aaryan on his dating life
कार्तिकने रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, “मी तर…”
vidya balan
“ही मुलगी पनवती…”, विद्या बालनने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाली, “एका मल्याळम चित्रपटात…”
Jitendra Joshi
जितेंद्र जोशीने चोरलेला ‘या’ दिग्गज बॉलीवूड अभिनेत्याचा फोटो; म्हणाला, “त्यानंतर जो मार खाल्ला…”
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
Meenakshi Seshadri
“चित्रपटाच्या करारावर सही…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ‘त्या’ गोष्टीमुळे कोसळले होते रडू; मीनाक्षी शेषाद्री आठवण सांगत म्हणाली, “त्यामुळे मी रडत…”
Deepti Devi
घटस्फोटानंतर पुन्हा रिलेशनशिपचा विचार केला नाहीस का? दीप्ती देवी म्हणाली, “मला परत स्वत:ला…”

‘ईटाईम्स’शी बोलताना नीतीने जन्माच्या काही मिनिटांतच तिचा मृत्यू झाला आणि ती पुन्हा जिवंत झाली होती, असा खुलासा केला आहे. निती टेलर म्हणाली, “मी लहान असताना मी मरणार होते. मी काही मिनिटांसाठी मेले होते आणि परत जिवंत झाले. तेव्हापासून मी आयुष्यात काहीतरी करू शकावं, यासाठी संघर्ष केला. ‘कैसी ये यारियां’ मालिका इतकी हिट होईल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण लोक आजपर्यंत आमच्या जोडीची आठवण काढतात. पार्थ आणि माझ्यावर खूप प्रेम करतात.”

मोठी बातमी! जिया खान आत्महत्या प्रकरणात अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता

पुढे बोलताना नीतीने काही महिन्यांपूर्वी आलेला एक अनुभव सांगितला. “एक महिन्यापूर्वी मी एक चित्रपट पाहायला गेले होते आणि एक मुलगी माझ्याकडे धावत आली व म्हणाली नंदिनी प्लीज थांब, त्यानंतर तिने मला जे सांगितलं ते ऐकून मी अवाक् झाले. तसेच आम्ही कलाकार कोणाच्या तरी आयुष्यावर कसा परिणाम करू शकतो हे त्या दिवशी मला समजलं. कोविडमध्ये त्या मुलीने तिचे वडील गमावले आणि तिला तिच्या कुटुंबात अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मुलीने सांगितले की तिने आत्महत्येचा निर्णय घेतला पण नंतर ती माझे व्लॉग बघू लागली आणि तिथूनच तिला जगण्याची आशा मिळाली. तिला माझा शो आवडतो, तिने मला इन्स्टाग्रामवर फॉलो केलं. तिथे माझं आयुष्य पाहिलं. मी सोशल मीडियावर खऱ्या आयुष्यात आहे, तशीच वागते, आनंद, दुःख ज्या भावना असतील त्या शेअर करते,” असं नीती म्हणाली.

नीतीला लहानपणी चॉकलेट खाण्याची परवानगी नव्हती, त्यामुळे तिचा चॉकलेट्स आवडत नाहीत. प्रकृतीमुळे व आजारपणामुळे तिचे कुटुंबीय तिला घराबाहेर खेळायलाही पाठवायचे नाहीत. पण त्या गोष्टींची कोणतीच तक्रार नसल्याचं नीती सांगते.