कलाकार हे मालिका, चित्रपट यामधून प्रेक्षकांचे मनोरंजन तर करतातच, मात्र सोशल मीडियावर रीलच्या माध्यमातूनदेखील चाहत्यांच्या भेटीला येत असतात. कधी विनोदी रील्स, तर डान्स करत हे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. आता ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकार अशाच एका रीलच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. नितीश चव्हाण, महेश जाधव आणि स्वप्नील कणसे या तीन कलाकारांनी शेअर केलला व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
नितीश चव्हाण, महेश जाधव आणि स्वप्नील कणसे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी ‘मेहबूबा’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचे पाहायला मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे या गाण्यातील तिघांचा लूकसुद्धा चाहत्यांचे मन जिंकत आहे. तिघांनीही कुर्ता घातला असून डोळ्यांना गॉगलदेखील लावला आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे.
काय म्हणाले नेटकरी?
नेटकऱ्यांनी या कलाकारांच्या डान्सचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “लय भारी दादा”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले, “जाळ, धूर, राडा, ये भाई कडक”, “जुने गाणं”, असं म्हणत नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे. या सगळ्यात ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत दुर्गाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शर्मिला राजाराम शिंदेने त्यांचे कौतुक करत कमेंट केली आहे. “वाह रे मुलांनो”, असे तिने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले आहे.
या आधीदेखील या तिघांनी ‘प्रेमिकाने प्यार से’ या गाण्यावर डान्स केल्याचे पाहायला मिळाले होते. या व्हिडीओलादेखील प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत होती.
झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत नितीश चव्हाण मुख्य भूमिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेत त्याने साकारलेली सूर्या दादाची भूमिका प्रेक्षकांची लाडकी झाली आहे. याबरोबरच महेश जाधव आणि स्वप्नील कणसे हे अनुक्रमे काजू आणि पुड्याच्या भूमिकेत आहे. ते सूर्याचे मित्र आहेत, जे त्याच्या दुकानातसुद्धा काम करताना दिसतात. या त्रिकुटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसते.
हेही वाचा: मुंबई-कर्जत ते मढ Island…; ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने मतदानासाठी ‘असा’ केला प्रवास, म्हणाली…
दरम्यान, मालिकेविषयी बोलायचे तर सध्या तेजूच्या लग्नाची घाई गडबड चालली असून पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.