‘लागिरं झालं जी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण लवकरच नव्या रुपातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील श्वेता शिंदेंची निर्मिती असलेली ‘लाखात एक आमचा दादा’ या नव्या मालिकेत नितीश सूर्यादादाच्या प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर या नव्या मालिकेचा पहिला-वहिला प्रोमो प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता मालिकेचा दुसरा दमदार प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमधून मालिकेतील सूर्यादादाच्या चार बहिणी कोण असणार आहेत? याचा खुलासा झाला आहे.

‘झी मराठी’ वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ‘लाखात एक आमचा दादा’ या नव्या मालिकेचा दुसरा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. “बहिणींना आईची माया देणारा, गावात देवमाणसाचा मान असणारा…‘लाखात एक आमचा दादा’…नवी मालिका ‘लाखात एक आमचा दादा’ लवकरच…”, असं कॅप्शन लिहित मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोची सुरुवात घंटानाद, तुतारीबरोबर ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जषघोषाने होतं आहे. त्यानंतर सूर्यादादाच्या चार बहिणींची झलक पाहायला मिळत आहे. त्याच्या मागे दादाचं वर्णन करणार मालिकेचं सुंदर शीर्षकगीत सुरू आहे. अशा या ‘लाखात एक आमचा दादा’ नव्या मालिकेच्या नव्या प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

Titeeksha Tawde
Video: मालिका संपल्यानंतर कलाकार पुन्हा आले एकत्र; तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Aishwarya Narkar
मालिका संपल्यानंतर कोकणात पोहोचल्या ऐश्वर्या नारकर, चुलीवर केला स्वयंपाक; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या..
Pankit Thakker and his wife Prachi Thakker divorce
प्रसिद्ध अभिनेत्याचा २४ वर्षांचा संसार मोडला, २१ व्या वर्षी वयाने मोठ्या अभिनेत्रीशी कुटुंबियांचा विरोध पत्करून केलेलं लग्न
It is impossible to put people with different views into one mold says actress Nivedita Saraf
भिन्न विचारांच्या व्यक्तींना एका साच्यात बांधणे अशक्य; अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे मत
Marathi actress tejashri Pradhan talk about her future life partner
अभिनेत्री तेजश्री प्रधानला ‘असा’ हवाय जोडीदार, म्हणाली, “फक्त नात्यात…”
Sharayu Sonawane
Video : ‘पारू’ फेम अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ; श्वेता खरात कमेंट करत म्हणाली…
zee marathi serial tula japnar ahe first promo pratisha shiwankar in lead role
दिसत नसले तरी असणार आहे…; ‘झी मराठी’वर सुरू होणार नवी थ्रिलर मालिका! प्रमुख भूमिकेतील अभिनेत्री कोण? पाहा पहिली झलक

हेही वाचा – ‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुनच्या साधेपणाने वेधलं लक्ष, पत्नीसह ५ स्टार हॉटेलमध्ये नाही तर जेवला ढाब्यावर, फोटो व्हायरल

नव्या मालिकेत सूर्यादादाच्या चार बहिणींची नावं तेजश्री, राजश्री, भाग्यश्री आणि धनश्री अशी आहेत. अभिनेत्री कोमल मोरे (तेजश्री), समुद्धी साळवी (धनश्री), इशा (राजश्री), जुई तनपुरे (भाग्यश्री) या चारजणी बहिणींच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. अद्याप ‘लाखात एक आमचा दादा’ नव्या मालिकेची सुरू होण्याची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आलेली नाही. पण मालिकेच्या दमदार प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

हेही वाचा – “म्हारी छोरियां छोरों से कम हैं के…”, पुतणी १२ वी पास झाल्यावर संतोष जुवेकरची पोस्ट, म्हणाला…

हेही वाचा – दुसऱ्यांदा होणार अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग सोहळा, ठिकाणही ठरलं; वाचा पाहुण्यांची यादी

दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ नव्या मालिकेत ‘लागिरं झालं जी’मधील आणखी एक अभिनेता झळकणार आहे. ‘लागिरं झालं जी’ मालिकेत पाहायला मिळालेला ‘टॅलेंट’ म्हणजेच अभिनेता महेश जाधव नव्या मालिकेत दिसणार आहे. याशिवाय ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेतील संजीवनीची मैत्रीण आणि ‘मन झालं बाजिंद’ मधील कृष्णा म्हणजेच अभिनेत्री श्वेता खरात ‘लाखात एक आमचा दादा’ झळकणार आहे. यासंदर्भात ‘मराठी टीव्ही इन्फो’ इन्स्टाग्राम पेजवर काही दिवसांपूर्वी पोस्ट शेअर करण्यात आली होती. त्यामुळे आता या नव्या मालिकेतील नितीश व श्वेता ही नवी जोडी प्रेक्षकांची मनं जिंकते की नाही? भावा आणि बहिणींची ही सुंदर कथा प्रेक्षकांना आवडते की नाही? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader