अभिनेत्री निवेदिता सराफ आपल्या अभिनयाच्या जोरावर घराघरांत लोकप्रिय झाल्या आहेत. सध्या त्या कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत. या मालिकेने नुकताच ४०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. याच निमित्ताने या मालिकेतील मुख्य कलाकारांसह निवेदिता यांनी ‘राजश्री मराठी’ला इन्स्टाग्राम लाइव्ह मुलाखत दिली. इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकारांना प्रश्न विचारता येतात. त्यामुळे यावेळी निवेदिता यांना त्यांच्या काही चाहत्यांनी प्रश्न विचारले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Video : ‘रॉकी और रानी…’ चित्रपटातील रणवीरच्या हॉट-डॅशिंग लूकचा व्हिडीओ व्हायरल, मराठमोळ्या अभिनेत्रीने केली खास कमेंट

निवेदिता सराफ यांनी मालिकेत राजवर्धनच्या आईची म्हणजेच ‘रत्नमाला मोहिते’ ही भूमिका साकारली आहे. कणखर आणि प्रसंगी भावनिक अशा रत्नामाला मोहितेंच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेसह निवेदिता सराफ दोन नाटकांत आणि मध्यंतरी एका चित्रपटात काम करत होत्या. याविषयी त्यांना इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये प्रश्न विचारण्यात आला. एका चाहतीने त्यांना “मॅडम तुम्ही थकत नाहीत का?”, असे विचारले.

हेही वाचा : जिनिलीया आणि रितेश देशमुख एकमेकांना कोणत्या नावाने हाक मारतात? अभिनेत्री खुलासा करत म्हणाली, “माझ्या सासूबाई…”

चाहतीच्या प्रश्नाला उत्तर देत निवेदिता सराफ म्हणाल्या, “तुम्ही रसिकप्रेक्षक आणि मालिकेतील सहकलाकार माझ्यावर एवढं प्रेम करतात की, मी कशी थकेन? अगदी मनापासून सांगते सेटवर माझी खूप काळजी घेतली जाते आणि प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम ही माझी खरी एनर्जी आहे. त्या एनर्जीला, प्रेक्षकांच्या प्रेमाला तुम्ही माझं ऑक्सिजनदेखील म्हणू शकता.”

हेही वाचा : “ज्येष्ठ आणि चतुरस्त्र…”, जयंत सावरकरांच्या निधनामुळे प्रसिद्ध मराठी अभिनेता भावुक

निवेदिता सराफ यांच्याबद्दल सांगताना अभिनेत्री तन्वी मुंडले म्हणाली, “मी स्वत: त्यांची एनर्जी पाहून आश्चर्य व्यक्त करते. दोन नाटकाचे प्रयोग, चित्रपटात काम करून एवढी मालिका करणे…ही सोपी गोष्ट नाही. त्यांचे कौतुक करावे तेवढी कमीच आहे.” दरम्यान, सध्या ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत कावेरीची स्मृती गेल्याचा ट्रॅक सुरु आहे. त्यामुळे भविष्यात मालिका कोणते रंजक वळण येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nivedita saraf replied to fans question says your all are my energy sva 00