मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी गेली अनेक दशके नाटक, मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ९०च्या दशकात ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धूम धडाका’, ‘दे दणादण’, ‘थरथराट’, ‘फेकाफेकी’, ‘कशासाठी प्रेमासाठी’ यांसारख्या चित्रपटात काम करुन त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी हिंदी चित्रपटांतही काम केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवेदिता सराफ यांनी नुकतीच ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी वाढतं वय, हिंदी सिनेमा, मालिकेत काम करण्याचा अनुभव अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेच्या वेळी आलेला ट्रोलिंगचा अनुभवही कथन केला. या मालिकेत त्यांनी आसावरी ही भूमिका साकारली होती.

हेही वाचा>> “आमची गाडी समृद्धी महामार्गावर निघाली अन्…”, नितीन गडकरींचा उल्लेख करत प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “वाईट वाटतं…”

त्या म्हणाल्या, “अग्गंबाई सासूबाई या मालिकेतील बबड्या या पात्रावर खूप टीका झाली होती. यावेळी ‘तुम्ही करोन होऊन मेलात तरी चालेल’ अशा तीव्र स्वरुपाच्या प्रतिक्रियांना मी सामोरी गेले. संहितेत लिहिलेलं अभिनयातून सादर करणं, हे माझं काम आहे. टीका करू नको असं माझं म्हणणं नाही. पण, टीका करुन तुम्ही वास्तव नाकारू शकत नाही. कारण आजही आपल्या मुलांना पाठिशी घालणाऱ्या अनेक आई आहेत. वास्तव हे कल्पनेपेक्षा जास्त दाहक असते.”

हेही वाचा>> “राजा माणूस…”, राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त केदार शिंदेंची खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाले…

सध्या निवेदिता सराफ कलर्स वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या मालिकेत त्या रत्नमाला मोहिते ही भूमिका साकारत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nivedita saraf shared her trolling experience agbai sasubai marathi serial kak