ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी कला क्षेत्राला दिलेलं योगदान मोठं आहे. निवेदिता यांनी आजवर मराठी मालिका, चित्रपट, नाटक या तिन्ही क्षेत्रांत उत्तमोत्तम काम करत प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. सोशल मीडियावर निवेदिता सराफ प्रचंड सक्रिय आहेत. रोज नवनवे फोटो आणि व्हिडीओ शेअर करुन त्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. नुकतंच एका मुलाखतीत निवेदिता सराफ यांनी पावसाळ्यात त्यांना काय करायला आवडतं याबाबतचा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “पैसे कमावण्याची संधी सोडून संघर्ष निवडला”, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला अभिनय क्षेत्रातील प्रवास; म्हणाली, “न्यूयॉर्क विद्यापीठात…”

निवेदिता म्हणाल्या, “मला पावसाळा खूप आवडतो. पण मुंबईत पावासामुळे चिखल होतो त्यामुळे मला तो घरात बसून खिडकीतून बघायला आवडतो. पण पूर्वी मी जेव्हा रनिंग करायचे आमचा एक ग्रुप होता रन इंडिया रन. मी पाच वर्ष मॅरेथॉन रनिंग केलं. त्यावेळी मी पहाटे पाच वाजता उठायचे आणि जूहू बीचवर जायचे रनिंग करायला. पण पावसात पळण्याची मजाच खूप वेगळी आहे. जेव्हा मी पावसात पळायची तेव्हा खूप छान वाटायचं.”

हेही वाचा- “तुझी आठवण येतेय”, वनिता खरातसाठी पती सुमित लोंढेची पोस्ट, म्हणाला “माझ्या जीवनात…”

सध्या निवेदिता ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत काम करताना दिसत आहेत. याआधी त्यांची ‘अग्गबाई सासूबाई’, ‘अग्गबाई सूनबाई’ या दोन्ही मालिका प्रचंड गाजल्या. शिवाय हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम करत आपला ठसा उमठवला. ‘सपनों से भरे नैना’, ‘ये जो है जिंदगी’, ‘केसरी नंदन’ सारख्या हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nivedita saraf talks about her favorite work in monsoons dpj
Show comments