‘द कपिल शर्मा शो’ सर्वात लोकप्रिय शो आहे. मागच्या बऱ्याच वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. बॉलिवूड कलाकारांपासून ते क्रिडा जगतातील लोकांनी या शोमध्ये हजेरी लावली आहे. या शोच्या आगामी एपिसोडचा प्रोमो नुकताच प्रसारित झाला असून या एपिसोडमध्ये अक्षय कुमार, सोनम बाजवा, नोरा फतेही, मौनी रॉय आणि दिशा पाटनी दिसणार आहेत. पण या एपिसोडमध्ये नोरा फतेहीने तिच्या डेटिंगबाबत केलेल्या खुलाशाची चर्चा सर्वाधिक होताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोनी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅन्डलवरून ‘द कपिल शर्मा शो’चा नवा प्रोमो शेअर करण्यात आला. यात आगामी एपिसोडची झलक दाखवण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार सांगतो की, “मला एक टेन्शन आहे.” त्यावर अर्चना पूरन सिंह त्याला, “कशाचं टेन्शन?” असा प्रश्न विचारते. त्यावर अक्षय उत्तरतो, “मला या गोष्टीचं टेन्शन आहे की, माझ्याबरोबर ४ अभिनेत्री फॉरेन टूरवर जात आहेत. पण मला घरी असं दाखवावं लागतंय की मी दुःखी आहे. जर तुम्ही या शोनंतर घरी परतल्यानंतर आनंदी दिसलात तर पुढचा शो कधीच होणार नाही.” पुढे अक्षय कपिलला म्हणतो, “तू तर विवाहित आहेस तुला तर माहीत आहे मी नेमकं काय म्हणतोय.” त्यावर कपिल म्हणतो, “जाऊद्यात आता यावर काय बोलणार.”

आणखी वाचा- Oscar 2023: ऑस्करमध्ये घडणार नाही विल स्मिथ प्रकरणासारखी घटना, अकादमीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

कपिल शर्मा अर्चनाला सांगतो, “तुम्हाला माहीत आहे का अर्चना जी, नोराने अलिकडेच मीडियासमोर एक वक्तव्य केलं होतं की जर मुलगा आणि मुलगी डेटवर जात असतील तर त्या डेटचं जे काही बिल असेल ते मुलानेच भरायला हवं.” कपिलच्या बोलण्यावर अर्चना म्हणते, “आता जग बदललं आहे. आता स्त्रियादेखील त्यांचं बिल भरतात.” त्यावर नोरा लगेच म्हणते, “तुम्ही असं करू शकता पण मी असं कधीच करत नाही.”

आणखी वाचा- आयकर विभागाच्या धाडी पडू नये म्हणून अक्षय कुमार आजही वडिलांनी दिलेला ‘हा’ सल्ला पाळतो

दरम्यान कपिल शर्मा शोच्या या एपिसोडची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. आगामी काळात अक्षय कुमारचा नवा शो The Entertainers tour in North America प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्यासाठी तो सोनम बाजवा, नोरा फतेही, मौनी रॉय आणि दिशा पाटनी यांच्याबरोबर फॉरेन टूर करताना दिसणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nora fatehi on kapil sharma show says she never pay bill on date mrj