‘प्यार की ये एक कहानी’, ‘मधुबाला – एक इश्क एक जुनून’ आणि ‘शक्ती – अस्तित्व के एहसास की’ यांसारख्या टीव्ही मालिकांमधून अभिनेता विवियन डिसेना लोकप्रिय झाला. सध्या तो बिग बॉस १८ मध्ये आहे. या शोच्या फॅमिली वीकमध्ये विवियनची पत्नी आली होती. नूरन अली ही इजिप्तमधील पत्रकार असून विवियनची दुसरीर बायको आहे. नूरनने विवियनशी भेट व त्याचा घटस्फोट याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नूरनने एका मुलाखतीत सांगितलं की तिची व विवियनची भेट कशी झाली. विवियन त्याची पहिली बायको अभिनेत्री वाहबीज दोराबजीबरोबर घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जात असताना नूरनची विवियनशी भेट झाली होती. विवियनची मुलाखत घेण्यासाठी नूरन प्रयत्न करत होती. दोघांचं संभाषण व्हॉट्सॲपवर सुरू झाला होतं, नंतर ते फोनवर बोलले आणि मग त्यांची प्रत्यक्षात भेट झाली. “त्यावेळी तो शक्तीचे शूटिंग करत होता, पण माझ्या देशात (इजिप्त) मधुबाला मालिका खूप गाजत होती. ती अरबी भाषेत डब करून एका मोठ्या चॅनेलवर दाखवली जात होती. त्यामुळे या चॅनलने त्याला बोलावायचं ठरवलं. त्यासाठी आम्हाला त्याच्या मुलाखती घ्यायच्या होत्या. मी तेव्हाच्या त्याच्या मॅनेजरला मेसेज केला, पण त्यांनी उत्तर द्यायला खूप वेळ घेतला. नंतर काही कारणांमुळे कार्यक्रम रद्द झाला,” असं नूरनने गलाट्टा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

“संजय कपूरने माधुरी दीक्षितला झापड मारल्यावर…”, दिग्दर्शकाने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाला, “मला वाटलं माझं करिअर संपलं”

नूरन विवियनला म्हणालेली, तू अहंकारी आहेस

नूरन पुढे म्हणाली, “मला माझ्या मॅगझीनसाठी त्याची मुलाखत घ्यायची होती. त्यामुळे मी तीन महिने त्याच्याशी बोलण्याचे प्रयत्न करत राहिले. नंतर शेवटी मी त्याला मेसेज केला की ‘लोक म्हणतात की तू अहंकारी आहेस आणि ते खरंय. कारण कोणी तुमच्या कामाबद्दल तुमचा आदर करतं तेव्हा तुम्ही त्यांचा आदर केला पाहिजे.’ नंतर त्याने मला उत्तर दिलं आणि सांगितलं की तो तसा नाही. तो खूप व्यग्र आहे, त्यामुळे मी समजून घ्यावं अशी विनंती केली. तसेच एक ते दोन दिवसांत तो मला मुलाखत देईल, असं आश्वासन त्याने दिलं आणि मुलाखत दिली.”

अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”

विवियनने पहिल्यांदा भावना व्यक्त केल्या होत्या, असं नूरनने सांगितलं. “तो म्हणाला, ‘मला तू खूप आवडतेस आणि हे नातं पुढे न्यायचंय, पण मी सध्या एका विचित्र परिस्थितीत आहे.’ त्याचा घटस्फोटाचा खटला अजूनही चालू होता. तो म्हणाला, “मी तुला कोणतेही वचन देऊ शकत नाही. पण मला एवढं माहीत आहे की मला तू खरोखर आवडतेस आणि तू माझ्याबरोबर राहणार असशील आणि संयम ठेवणार असशील तर मी हे नातं पुढे नेऊ इच्छितो.”

हेही वाचा – अभिनेत्री हंसिका मोटवानीसह तिच्या आई अन् भावाविरोधात वहिनीची पोलीस तक्रार, तीन वर्षांपूर्वी झालंय लग्न

विवियनच्या घटस्फोटाबद्दल नूरन म्हणाली..

विवियनच्या घटस्फोटाबद्दल नूरनने भाष्य केलं. विवियन व त्याची पहिली वाहबीज दोन्हीबद्दल नूरनने सहानुभूती व्यक्त केली. “जी व्यक्ती दीर्घकाळ एखाद्या नात्यात असते ती भावनिक आणि मानसिकदृष्ट्या गुंतलेली असते. अशी नाती तुटतात तेव्हा दोघांवरही त्याचा परिणाम होतो. विवियन त्याबद्दल बोलत नाही, पण तो खूप कठीण काळातून गेला होता. त्याच्याप्रमाणेच समोरची व्यक्तीही. कारण एक म्हणून तिलाही खूप गोष्टींचा सामना करावा लागला असेल. कोणताही घटस्फोट आनंदी नसतो; त्याचे परिणाम हे दोघांवरही होतात. तिला (वाहबीज) मानसिकदृष्ट्या जे सहन करावं लागलं, त्याबद्दल व्यक्त होण्याचा तिला अधिकार आहे. घटस्फोटित महिलांबद्दल आपला समाज फार चांगलं बोलत नाही.”

हेही वाचा – ९ फ्लॉप चित्रपट, तरीही नाकारला ९०० कोटी कमावणारा बॉलीवूड सिनेमा; नेत्याशी लग्न केलं अन्…; कोण आहे ही अभिनेत्री?

नूरनने तिच्या भूतकाळाबद्दल आणि विवियनने तिच्या कुटुंबाला मनापासून कसं स्वीकारलं याबद्दल सांगितलं. “मीही घटस्फोटित आहे. मला लैला आणि आलिया नावाच्या दोन मुली आहेत. एक १० आणि दुसरी आठ वर्षांची आहे. त्या बहरीनमध्ये शिकतात. माझ्या कुटुंबात माझे आई-वडील, तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. विवियनने माझ्या आयुष्यातील एक मोठी पोकळी भरून काढण्यासाठी खूप मदत केली. मी एका वाईट नात्यातून बाहेर पडले होते. त्याला माझी मानसिकता, मी कोणत्या परिस्थितीतून आलेय याची जाणीव होती. त्याने मला समजून घेतलं. माझ्या मुलींना स्वीकारलं आणि त्यांच्या स्वतःच्या मुलींसारखं प्रेम दिलं. यामुळे मला सुरक्षित वाटतं,” असं नूरन म्हणाली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nouran aly on vivian dsena vahbiz dorabzee divorce says she must be gone through lot hrc