लोकप्रिय टीव्ही अभिनेता विवियन डिसेना हा सध्या बिग बॉस 18 या रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे. त्याने २०१९ मध्ये इस्लाम धर्म स्वीकारला आणि २०२२ मध्ये त्याने इजिप्तमधील पत्रकार नूरन अलीशी लग्न केलं. बिग बॉसमध्ये नुकताच फॅमिली वीक एपिसोड झाला. त्यासाठी नूरन बिग बॉस 18 मध्ये आली होती. शोमधून आल्यानंतर नूरनने एका मुलाखतीत तिच्या व विवियनच्या नात्यात सुरुवातीला आलेल्या आव्हानांबद्दल सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘गॅलाट्टा इंडिया’शी बोलताना नूरन म्हणाली की जेव्हा विवियनने त्याच्याशी लग्न करण्यासाठी इस्लाम स्वीकारला तेव्हा तिला लोकांच्या द्वेषाचा सामना करावा लागला. इतकंच नाही तिच्यावर लव्ह जिहादचा आरोपही झाला होता. या गोष्टीचा इतका परिणाम झाला की ती त्याच्यापासून सहा महिने वेगळीही झाली होती.

हेही वाचा- विवियन डिसेनाची दुसऱ्या बायकोशी भेट कशी झाली? नूरनने स्वतःच सांगितलं; त्याच्या पहिल्या बायकोबाबत म्हणाली…

नूरन म्हणाली, “विवियनने इस्लाम स्वीकारल्याबद्दल माझ्यावर लव्ह जिहादचा आरोप झाला. त्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आणि त्याचा परिणाम त्याच्या कामावरही परिणाम झाला. धार्मिक श्रद्धा व भाषेबाबत आमच्यात खूप फरक आहे. मी त्याला आधीच स्पष्ट सांगितलं होतं की, माझ्या धर्मामुळे मी त्याच्याशी आंतरधर्मीय लग्न करू शकत नाही. आमच्या धर्मात त्या गोष्टीला मान्यता नाही. विवियन ख्रिश्चन होता. पण आमच्या धर्मात स्त्रिया धर्म बदलून दुसऱ्या धर्मात लग्नही करत नाहीत. म्हणून मी सहा महिने त्याच्यापासून दूर झाले. कारण तो माझ्यासाठी धर्म बदलेल की नाही याची मला खूप काळजी आणि भीती वाटत होती.”

हेही वाचा – अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”

नूरन पुढे म्हणाली, “मला वाटलं की जर त्याने एका महिलेसाठी धर्म बदलला तर समाजात त्याला बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागेल. दुसरं म्हणजे, मी त्याच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही, तर नंतर त्याला पश्चाताप होईल. कारण हा एक मोठा निर्णय होता. आम्ही सहा महिने बोललो नाही आणि मी त्याच्या मेसेजेसना उत्तर दिले नाही. नंतर मला आमच्या एका कॉमन मित्राकडून समजलं की तो माझ्या धर्माचा अभ्यास करत आहे. यात माझा कोणताही हस्तक्षेप नव्हता. तो त्यासाठी लोकांना भेटत होता. नंतर सहा महिन्यांनी त्याने माझ्या मित्रांना सांगितलं की त्याला माझ्याशी बोलायचं आहे. तो म्हणाला की तो माझ्यासाठी नाही तर स्वत:साठी धर्मांतर करण्यास तयार आहे. त्यामुळे मी त्याच्याबरोबर नसेन तरीही तो इस्लाम स्वीकारेल. तो हे स्वतःसाठी करतोय की माझ्यासाठी यावर विश्वास ठेवायला मला १-२ आठवडे लागले. कारण त्याने माझ्यासाठी त्याचं मूळ सोडावं, अशी माजी अजिबात इच्छा नव्हती.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nouran aly reacts on vivian dsena islam conversion for second marriage people accused me for love jihad hrc