टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रियालिटी शो ‘बिग बॉस १७’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. दिवसेंदिवस हा शो रंगतदार होताना दिसत आहे. या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला काही आठवडेच शिल्लक राहिले आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून अंकिता लोखंडे व विकी जैनमध्ये वाद होताना बघायला मिळत आहे. अंकिता व विकीच्या आईंनी समजावूनही कोणताच फरक पडलेला दिसून आलेला नाही. सलमान खानच्या मार्गदर्शनानंतरही दोघांमधील वाद सुरूच असल्याचे बघायला मिळत आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस १७’ चा नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अंकिता व विकीमधील वाद आणखी वाढल्याचे बघायला मिळाले. विकी अंकिताला विचारतो की, “माझ्यात काय दोष आहे?”, यावर अंकिता म्हणते की, “तुझ्यामध्ये सहानुभूती नसल्यामुळे आपल्या नात्यात अडचण निर्माण झाली आहे, हा प्रॉब्लेम आहे.” त्यावर विकी चिडतो व म्हणतो, “जेव्हा तू मुनव्वरचा हात पकडायचीस, त्याला मिठी मारली तेव्हा मीसुद्धा असंच वागायला हवं होतं. तुझे सगळे संबंध पवित्र आहेत आणि माझे सर्व वाईट आहेत.”
विकीचे हे बोल ऐकून अंकिता म्हणते, मला असुरक्षित वाटतं. त्यानंतर विकी अंकितावर आणखी चिडतो; म्हणतो, “बस झालं, मला हे सगळं करून कंटाळा आला आहे.” यावर अंकिता म्हणते मीसुद्धा थकली आहे, हे सगळं करून. यावर विकी पुन्हा म्हणतो, “काहीच नाही केलंस तू, मी आता खरं सांगायला सुरुवात केली तर तू ऐकूही शकणार नाहीस.”
हेही वाचा- अंकिता लोखंडेला अभिनेत्री असूनही न चुकलेला ‘सासुरवास’
या अगोदरही ‘बिग बॉस’च्या घरात अंकिता व विकीमध्ये जोरदार भांडणे झालेली बघायला मिळाली होती. रागाच्या भरात अंकिताने विकिला चप्पलही फेकून मारली होती. या प्रकारानंतर विकीचे आई-बाबा अंकितावर चांगलेच भडकले होते. त्यांनी अंकिताच्या आईला फोन करून तुम्ही तुमच्या पतीला अशा चप्पल मारायच्या का? असे विचारले होते.