‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून ओंकार भोजनेला ओळखले जाते. कॉमेडी किंग अशी त्याची ओळख सांगितली जाते. काही दिवसांपूर्वीच ओंकार भोजनेचा ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम ओंकारने सोडल्यावर त्याचे चाहते नाराज झाले आहेत. यावरच आता ओंकारने भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ओंकार त्याच्या ‘सरला एक कोटी चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त एका रेडिओ चॅनेलवर गेला होता. त्याच्याबरोबर ईशा केसकरदेखील होती. तिथे त्याला प्रश्न विचारण्यात आला की “हास्यजत्रा कार्यक्रम सोडल्यावर प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रिया आल्या का?” त्यावर ओंकार म्हणाला, “नाही मला तशा थेट प्रतिक्रिया आल्या नाहीत आणि मी मुळात सोशल मीडियावर नसल्याने तसं काही वाटलं नाही. नकारात्मक प्रतिक्रिया अशा आल्या नाहीत बातम्या काही आल्या पण मला त्रास देणारा असा कुठला विषय नव्हता. प्रत्येकाच्या अपेक्षा असतात आपण कसे बघतो हे अवलंबून असतात. जे प्रेक्षक नाराज झालेत त्यांच्यासाठी मी दुसऱ्या संधीची वाट बघत आहे.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

“आम्ही मित्र नाही पण…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम गौरव मोरेबद्दल ओंकार भोजनेची प्रतिक्रिया

काही महिन्यांपूर्वी ओंकारने झी मराठीवरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेला रामराम केला. यामुळे अनेक चाहत्यांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली होती. हास्यजत्रा सोडण्यामागे ओंकारने स्पष्टीकरणदेखील दिले होते.

‘सरला एक कोटी’ या चित्रपटात ओंकार भोजने, ईशा केसरकर मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. तसेच या चित्रपटाची कथा ग्रामीण भागावर आधारित असल्याचं टीझर पाहिल्यानंतर लक्षात येतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन सिंधु विजय सुपेकर यांनी केलं आहे.