Online TRP Updates : छोट्या पडद्यावरील वाहिन्यांमध्ये सध्या टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. मात्र, अलीकडच्या काळात अनेक प्रेक्षक ‘झी ५’, ‘जिओ सिनेमा’, ‘हॉटस्टार’ अशा ओटीटी माध्यमांवर मराठी मालिका व कार्यक्रम पाहणं पसंत करतात. त्यामुळे दर आठवड्यात टेलिव्हिजन टीआरपीप्रमाणे ऑनलाइन TRPची देखील स्वतंत्र यादी काढली जाते. ‘मराठी टीआरपी तडका’ या इन्स्टाग्राम पेजवरून या आठवड्याची क्रमवारी शेअर करण्यात आली आहे. यामध्ये ‘बिग बॉस मराठी’ या नव्याने सुरू झालेल्या शोने बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे.
रितेश देशमुख होस्ट करत असलेला ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन नुकताच जुलै महिन्याच्या अखेरिस प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हे पाचवं पर्व सध्या दणक्यात सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, अवघ्या दोन आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’ने टीआरपीच्या शर्यतीत लोकप्रिय मालिकांना मागे काढत चौथं स्थान पटकावलं आहे.
हेही वाचा : बंगाली लूक, गुलालाची उधळण अन्…; ऐश्वर्या नारकर झळकणार नव्या रुपात! ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’चा जबरदस्त प्रोमो चर्चेत
टेलिव्हिजनप्रमाणे मालिकांच्या TRP मध्ये सुद्धा ‘ठरलं तर मग’ मालिकेचं अव्वल स्थान कायम आहे. या पाठोपाठ मुक्ताच्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेने दुसरं स्थान पटकावलं आहे. कलाची ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका तिसऱ्या स्थानावर तर, ‘बिग बॉस मराठी’ अभूतपूर्व यश मिळवत अवघ्या दोन आठवड्यात चौथं स्थान मिळवलं आहे. ‘बिग बॉस मराठी’ची लोकप्रियता अशीच वाढली तर थोड्याच दिवसात हा कार्यक्रम आघाडीच्या दोन मालिकांना टक्कर देईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
टॉप – १० कार्यक्रमांची यादी
१. ठरलं तर मग – हॉटस्टार
२. प्रेमाची गोष्ट – हॉटस्टार
३. लक्ष्मीच्या पाऊलांनी – हॉटस्टार
४. बिग बॉस मराठी – जिओ सिनेमा
५. थोडं तुझं आणि थोडं माझं – हॉटस्टार
६. घरोघरी मातीच्या चुली – हॉटस्टार
७. नवरी मिळे हिटलरला – झी ५
८. येड लागलं प्रेमाचं – हॉटस्टार
९. मुरांबा – हॉटस्टार
१०. पारू – झी ५
दरम्यान, ऑनलाइन टीआरपीमध्ये टॉप – १० च्या यादीत ‘हॉटस्टार’ म्हणजेच ‘स्टार प्रवाह’च्या सर्वाधिक मालिका आहेत. सध्या ‘बिग बॉस मराठी’ची लोकप्रियता आणखी वाढत असल्याने आता येत्या काळात टीआरपीच्या यादीत कोणता उलटफेर होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.