Online TRP : सध्या मालिकांप्रमाणेच आणखी एका रिअ‍ॅलिटी शोची सर्वत्र चर्चा चालू आहे हा कार्यक्रम म्हणजे बिग बॉस मराठी. यंदा २८ जुलैपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला. गेले चार सीझन या कार्यक्रमाची जबाबदारी अभिनेते – दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांभाळली होती. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच रितेश देशमुख ‘बिग बॉस मराठी’चं होस्टिंग करत आहे. या पाचव्या सीझनला सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. टेलिव्हिजन व ऑनलाइन टीआरपीमध्ये ‘बिग बॉस मराठी’चा दबदबा प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. या आठवड्याच्या ऑनलाइन TRP मध्ये कोणी बाजी मारली जाणून घेऊयात…

‘बिग बॉस मराठी’ पाचवं पर्व सध्या चांगलंच चर्चेत आहे. घरात दररोज होणारे वाद, टास्क आणि यानंतर रितेश देशमुख ज्याप्रकारे या सगळ्या सदस्यांनी शाळा घेतोय…या गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून अवघ्या एक महिन्यातच टीआरपीच्या शर्यतीत या कार्यक्रमाने चौथं स्थान पटकावलं आहे. शिवानी सुर्वेच्या ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या लोकप्रिय मालिकेला मागे टाकत ‘बिग बॉस मराठी’ने रेकॉर्डब्रेक ऑनलाइन टीआरपी आणला आहे. ऑनलाइन टीआरपीच्या शर्यतीत कोणत्या मालिकांनी बाजी मारली याची संपूर्ण यादी ‘मराठी टीआरपी तडका’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
top 10 search on google in 2024
Google Search: भारतीय गुगलवर गेल्या वर्षभरात काय शोधत होते माहितीये? गुगल सर्च रिपोर्टची माहिती आली समोर!
Pune Railway Station in 1965
१९६५ मध्ये पुणे स्टेशन कसं होतं? VIDEO एकदा पाहाच
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?
viral video
VIDEO : असे विद्यार्थी मराठी शाळेतच घडू शकतात! संगणकालाही टक्कर देतात हे विद्यार्थी, अनोखी कला एकदा पाहाच

हेही वाचा : Bigg Boss Marathi…अन् सगळ्यांशी भांडणारी निक्की ढसाढसा रडली! अरबाजबद्दल म्हणाली, “मी या मुलासाठी…”

ऑनलाइन टीआरपीमध्ये ( Online TRP ) ‘ठरलं तर मग’ मालिका अव्वल स्थानी आहे. गेली अनेक महिने या मालिकेने आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे. यानंतर अनुक्रमे कला व मुक्ताचा नंबर लागतो. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका दुसऱ्या स्थानी, तर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला ऑनलाइन टीआरपीमध्ये तिसरं स्थान मिळालं आहे.

ऑनलाइन TRP टॉप – १० कार्यक्रम व मालिकांची यादी

१. ठरलं तर मग – हॉटस्टार
२. लक्ष्मीच्या पाऊलांनी – हॉटस्टार
३. प्रेमाची गोष्ट – हॉटस्टार
४. बिग बॉस मराठी – जिओ सिनेमा
५. थोडं तुझं आणि थोडं माझं – हॉटस्टार
६. घरोघरी मातीच्या चुली – हॉटस्टार
७. नवरी मिळे हिटलरला – झी ५
८. येड लागलं प्रेमाचं – हॉटस्टार
९. मुरांबा – हॉटस्टार
१०. पारू – झी ५

online trp
Online TRP मध्ये बिग बॉस मराठीने मारली बाजी

हेही वाचा : दोन दिवसांत अभिजीत सावंत बदलला…; मित्रमंडळींचा मोठा आरोप! निक्कीशी मैत्री पडली भारी, नेमकं काय घडलं?

दरम्यान, ऑनलाइन टीआरपीच्या यादीत टॉप -१० मध्ये ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या हॉटस्टारवर पाहिल्या जाणाऱ्या एकूण सात मालिका आहेत. याशिवाय ‘झी मराठी’च्या Zee 5 वर पाहिल्या जाणाऱ्या दोन मालिका आहेत. तर, जिओ सिनेमावर ‘बिग बॉस मराठी’ पाहणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच या रिअ‍ॅलिटी शोने थेट चौथं स्थान मिळवलं आहे.

दरम्यान, आता येत्या काळात ‘बिग बॉस मराठी’चा खेळ आणखी रंजक होत जाणार आहे. त्यामुळे हा रिअ‍ॅलिटी शो Online TRP मध्ये टॉप ३ च्या यादीत एन्ट्री घेणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader