Bigg Boss Marathi Online TRP : छोट्या पडद्यावरील प्रत्येक कार्यक्रमाची लोकप्रियता ही टीआरपीवरून ठरत असते. त्यामुळे टीआरपीत सातत्य राखण्यासाठी वाहिन्यांमध्ये नेहमीच चढाओढ सुरू असते. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोचं ऑनलाइन प्रसारण जिओ सिनेमावर करण्यात येतं. त्यामुळे ‘बिग बॉस’ ऑन एअर झाल्यावर जिओ सिनेमाचा टीआरपी वाढेल अशी सर्वत्र चर्चा चालू होती. अखेर हा अंदाज आता खरा ठरला आहे.

‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सुरू झाल्यावर पहिल्या आठवड्याचा Online TRP आता प्रेक्षकांसमोर आला आहे. या आठवड्यात ऑनलाइन TRP च्या यादीत मोठा उलटफेर झाला असून, जिओ सिनेमाने ‘बिग बॉस मराठी’ला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे या यादीत थेट सहावं स्थान मिळवलं आहे. याचा अर्थ रितेश देशमुख होस्ट करत असलेल्या या नव्या सीझनला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. हा ऑनलाइन टीआरपी ‘मराठी टीआरपी तडका’ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आहे. २७ जुलै ते २ ऑगस्ट या दरम्यानचा हा ऑनलाइन टीआरपी आहे.

Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
three cheetahs attack the fox
‘तिघांच्या तावडीतून तो सटकला…’, तीन चित्त्यांचा कोल्ह्यावर हल्ला; थरारक VIDEO पाहून व्हाल शॉक
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?
Police scolded truck driver for writing shayari on truck viral video on social media
तू एवढा देखणा आहेस? ट्रकवर लिहलेली शायरी पाहून रस्त्यातच अडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा पोलिसांनी नेमकं काय केलं
a groom said amazing ukhana for bride
“मेथीची भाजी आहे स्वस्त…” नवरदेवाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा : Bigg Boss Marathi : आर्याचं एकतर्फी प्रेम; वैभव-इरिनाला एकत्र पाहून ढसाढसा रडली! नेटकरी म्हणाले, “अगदी बालिशबुद्धी…”

ऑनलाइन टीआरपीच्या यादीत टॉप – १० मध्ये कोणत्या मालिका आणि कार्यक्रम आहेत जाणून घेऊयात…

Online TRP : टॉप १० कार्यक्रम व मालिका

१. ठरलं तर मग – हॉटस्टार
२. लक्ष्मीच्या पाऊलांनी – हॉटस्टार
३. प्रेमाची गोष्ट – हॉटस्टार
४. थोडं तुझं आणि थोडं माझं – हॉटस्टार
५. घरोघरी मातीच्या चुली – हॉटस्टार
६. बिग बॉस मराठी – जिओ सिनेमा
७. नवरी मिळे हिटलरला – झी ५
८. येड लागलं प्रेमाचं – हॉटस्टार
९. मुरांबा – हॉटस्टार
१०. पारू – झी ५

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “वर्षाताई एक नंबर…”, वर्षा उसगांवकरांच्या ‘या’ निर्णयाचं नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक, नेमकं काय घडलंय? वाचा

trp
Online TRP पाहा संपूर्ण यादी

दरम्यान, टेलिव्हिजनप्रमाणे, ऑनलाइन टीआरपीच्या ( Online TRP ) यादीत सुद्धा ‘स्टार प्रवाह’च्या ‘ठरलं तर मग’ मालिकेने आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. प्रतिमाची एन्ट्री झाल्यापासून या कार्यक्रमाची लोकप्रियता आणखी वाढली आहे. आता येत्या काळात ‘बिग बॉस मराठी’ टॉप ५ मध्ये एन्ट्री घेणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Story img Loader