‘शार्क टँक इंडिया’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. या कार्यक्रमात अनेक स्पर्धक म्हणून छोटे-मोठे उद्योजक आपल्या व्यावसायिक कल्पना मांडतात आणि शार्क (परीक्षक) स्पर्धकांच्या व्यवसायात गुंतवणूक करायची की नाही हे ठरवतात. अशा या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाचे पहिले दोन पर्व चांगलेच गाजले. त्यामुळे आता या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पण अशातच शार्क टँक संबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे. शार्क टँकच्या आगामी पर्वात एक मोठा बदल करण्यात आला. नव्या परीक्षकाची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे सध्या नवा परीक्षकाची जोरदार चर्चा सुरू आहे.
हेही वाचा – Video: अखेर क्रांती आणि समीर वानखेडेंच्या जुळ्या मुलींची पहिली झलक समोर; अभिनेत्रीने शेअर केला गोड व्हिडीओ
‘शार्क टँक इंडिया’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. यामध्ये नव्या शार्कचं स्वागत इतर शार्क करताना दिसत आहेत. हा नवा शार्क दुसरा तिसरा कोणी नसून ‘ओयो रुम’ कंपनीचे संस्थापक रितेश अग्रवाल असणार आहेत. याबाबत रितेश यांनी देखील एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
हेही वाचा – Video: ‘काव्यांजली’ मालिकेत नव्या प्रीतमची जबरदस्त एन्ट्री, पाहा व्हिडीओ
हेही वाचा – “रसिकांना खरंच मायबाप का म्हणतात ते समजतंय” अक्षय केळकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
रितेश अग्रवाल यांनी अमन गुप्ता, अनुपम मित्तल, विनीता सिंह आणि पीयूष बंसल यांच्याबरोबर फोटो शेअर करत लिहीलं आहे की, “मी शार्क टँक इंडियाच्या तिसऱ्या पर्वाचा एक छोटासा भाग असणार आहे. कारण मी देशाच्या कानाकोपऱ्यातील स्टार्टअप संस्थापकांना मदत करू इच्छितो.” दरम्यान ‘शार्क टँक इंडिया’च्या तिसऱ्या पर्वाचे शूटिंग सुरू झाले आहे. त्यामुळे लवकरच सोनी लिव्हवर हा कार्यक्रम प्रसारित होण्याची शक्यता आहे.