Marathi Actress Rucha Vaidya Engagement: २०२४ मध्ये अनेक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकले. आता २०२५ या वर्षाच्या सुरुवातीलाच एका मराठी अभिनेत्रीने आनंदाची बातमी दिली आहे. २०२४ मध्ये मराठी सिनेविश्वात पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रीने साखरपुडा उरकला आहे. तिच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रियांका चोप्राची निर्मिती असलेला ‘पाणी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री रुचा वैद्य हिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. रुचा वैद्यने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच साखरपुडा उरकला आहे. रुचाच्या इंगेजमेंटचे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आहेत.
हेही वाचा – Video: पती अभिषेक बच्चन अन् लेकीबरोबर मुंबईत परतली ऐश्वर्या राय; मराठीत म्हणाली असं काही की…, पाहा व्हिडीओ
रुचा वैद्यच्या होणाऱ्या पतीचे नाव यश किरकिरे आहे. रुचाने तिच्या साखरपुड्यातील अनेक फोटो इन्स्टाग्रामवर रिपोस्ट केले आहेत. त्यात तिच्या साखरपुड्यातील काही खास क्षण पाहायला मिळत आहेत. रुचा व यश यांनी साखरपुड्यासाठी दोन लूक केले होते. पारंपरिक लूकसाठी रुचाने लाल काठांची हिरवी साडी नेसली होती, तर यशने कुर्ता घातला होता.
हेही वाचा – प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ३१ डिसेंबरला बांधली लग्नगाठ, पारंपरिक पद्धतीने पार पडला सोहळा, पाहा Photos
पाहा फोटो –
दुसऱ्या लूकसाठी रुचाने डिझायनर साडी निवडली होती, तर यशने सूट घातला होता. रुचाला आयुष्यातील या नवीन सुरुवातीसाठी चाहते शुभेच्छा देत आहेत.
दरम्यान, रुचा वैद्यच्या पहिल्यावहिल्या ‘पाणी’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास नितीन दीक्षित यांनी या सिनेमाची कथा लिहिली होती. ‘पाणी’मध्ये अदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी आणि विकास पांडुरंग पाटील यांनी काम केलं होतं. नेहा बडजात्या आणि दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनास आणि डॉ. मधु चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. तर महेश कोठारे आणि सिद्धार्थ चोप्रा या प्रकल्पाचे सहयोगी निर्माते होते. १८ ऑक्टोबर रोजी ‘पाणी’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, चित्रपटाला प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. ‘पाणी’ चित्रपट अमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
‘पाणी’मध्ये नांदेडमधल्या नागदेरवाडी गावातील हनुमंत केंद्रे यांची वास्तव कथा या चित्रपटात दाखवण्यात आली होती. या सिनेमात रुचाने सुवर्णा ही भूमिका केली होती.