Paaru Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवर श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ‘गोविंदा आला रे’ या कार्यक्रमाचं खास आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकप्रिय मालिकेतील कलाकार विविध गाण्यांवर थिरकताना दिसले. ‘झी मराठी’च्या ‘पारू’ मालिकेने देखील अल्पावधीतच प्रेक्षकांनी पसंती मिळवली आहे. यामधल्या पारू अन् आदित्यच्या ऑनस्क्रीन जोडीने एकत्र डान्स करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

झी मराठीच्या ‘पारू’ ( Paaru ) मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे ‘पारू’ ही मुख्य भूमिका साकारत आहे. तर, अभिनेता प्रसाद जवादे या मालिकेत आदित्य किर्लोस्कर हे पात्र साकारत आहे. या मालिकेत नेहमीच विविध ट्विस्ट येत असतात. परंतु, जन्माष्टमीचा हा सण साजरा करण्यासाठी हे सगळे कलाकार शूटिंगमधून वेळ काढत एकत्र जमले आहेत. यावेळी पारू आणि आदित्यने जुन्या मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचं पाहायला मिळालं आहे.

ladies group dance on marathi song kakhet kalasa gavala valsa kashala marathi old song video goes viral
“काखेत कळसा गावाला वळसा कशाला?” जुन्या मराठी गाण्यावर महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
a young girl amazing dance on a stage Her face expression
Video : तरुणीने केला एक नंबर डान्स! चेहऱ्यावरील हावभाव आणि ऊर्जा पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
bride groom dance on Bollywood song Akelaa hai mister khilaadi miss khilaadi chaahiye
Video : अकेला है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिए! नवरी नवरदेवाने केला बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Video : an old couple dance on angaro ka ambar sa song in pushpa movie
Video : क्या बात! आज्जी आजोबांनी ‘पुष्पा’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “जोडी असावी तर अशी..”
little boy danced to the song aaj ki raat at restaurant the video is currently going- viral on social Media
“आज की रात मजा हुस्न का लिजीये” गाण्यावर हॉटेलमध्ये चिमुकल्याचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून थक्क व्हाल असा डान्स
ladies group dance on Tuzya Pritit Zale Khuli marathi song video goes viral
VIDEO: “तुझ्या प्रितीत झाले खुळी..” महिलांच्या तुफान डान्सनं सगळ्यांना लावलं वेड; खास अंदाज पाहून कराल कौतुक
Beautiful dance performance by barkat arora
‘हिच्या डान्सपुढे हिरोईनही पडेल फिकी…’; बघाल तर बघतच राहाल चिमुकलीचा डान्स; पाहा VIDEO

हेही वाचा : Bigg Boss Marathi : पहिल्याच आठवड्यात बेघर झालेल्या पुरुषोत्तमदादा पाटलांना भेटण्यासाठी जपानी चाहत्याने थेट गाठली आळंदी, पाहा व्हिडीओ

पारू अन् आदित्यचा मराठमोळा लूक

पारूने ( Paaru ) जांभळ्या रंगाची नऊवारी साडी, त्यावर मॅचिंग बांगड्या, त्यावर शोभेल असा ब्लाऊज, नाकात नथ, केसात गजरा, गळ्यात मोत्याचे दागिने असा मराठमोळा लूक केला होता. तर, आदित्यने सुद्धा पारूच्या साडीला मॅचिंग होईल असा गुलाबी रंगाचा कुर्ता आणि त्यावर जांभळ्या रंगाचं जॅकेट घातलं होतं. पारू-आदित्यच्या या लूकचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. दोघेही या पारंपरिक लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत.

हेही वाचा : Video : ‘शुभविवाह’ मालिकेतील कलाकारांचा मजेशीर व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर, म्हणाले, “आता आप्पाचा जीव घेता का?”

नेटकऱ्यांनी देखील पारू-आदित्यच्या या लूकचं आणि जबरदस्त डान्सचं भरभरून कौतुक केलं आहे. या दोघांनीही “रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना…” या आशा भोसले यांच्या लोकप्रिय गाण्यावर डान्स केला आहे. “दोघांचीही केमिस्ट्री सुंदर आहे”, “प्रसादचा डान्स”, “पारू आणि आदित्य बेस्ट”, “मस्त डान्स” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “रितेशला ठरवून कुणाचा अपमान करता येत नाही”, लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट; म्हणाली, “त्याच्या डोळ्यात…”

bigg boss
Bigg Boss Marathi : नेटकऱ्यांकडून कौतुक

दरम्यान, ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ ( Paaru ) मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे, प्रसाद जवादे, मुग्धा कर्णिक, परि तेलंग, पूर्वा शिंदे, यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Story img Loader