प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आणि त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण करण्यासाठी मालिकांमध्ये सतत ट्विस्ट पाहायला मिळतात. आता झी मराठी वाहिनीवरील पारू आणि सावळ्याची जणू सावली या मालिकांचा महासंगम होणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. जिथे पारूला सावलीचे सत्य समजणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पारू सावलीच्या आवाजाचं सत्य समोर आणणार?

झी मराठी वाहिनीने, सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, ताराची आई घोषणा करते की, तुमच्या सगळ्यांसमोर सादर करीत आहे, संगीत क्षेत्रातील एक लखलखता तारा, तारा वझे. त्यानंतर तारा गायला लागते. प्रेक्षकांमध्ये सारंग, सारंगची आई, पारू, आदित्य असे सगळे बसले आहेत. तारा गायला सुरुवात करते. स्टेजच्या पाठीमागून सावली गात आहे. पारूला याची जाणीव होते की, हा तर सावलीचा आवाज आहे. पारू मनातल्या मनात म्हणते, “मला सकाळी भेटली ती सावलीच होती. ह्यो आवाज बी तिचाच हाय. सावली गेली कुठं?”

या व्हिडीओमध्ये पुढे पाहायला मिळते की, आदित्यला त्याच्या आईचा अहिल्यादेवीचा फोन येतो. ती त्याला विचारते, “आदित्य पोहोचलास का? मुलगी बघण्यासाठीच तर तुला तिकडे पाठवलंय मी. पसंत आहे की नाही ते सांग” दुसरीकडे सावलीला शोधत पारू स्टेजच्या मागे जाते. जिथे सावली तारासाठी गाणे गात असते. सावलीला पाहून पारू आश्चर्याने सावली, अशी हाक मारते.

झी मराठी इन्स्टाग्राम

झी मराठीने हा प्रोमो शेअर करताना, पारू सर्वांसमोर आणेल का सावलीच्या आवाजाचं सत्य?, अशी कॅप्शन दिली आहे.

‘पारू’ या मालिकेत नुकतेच प्रीतमचे प्रियाबरोबर लग्न झाले आहे. आता अहिल्यादेवीला आदित्यच्या लग्नाची काळजी लागली आहे. त्यामुळे तिने आदित्यसाठी मुली बघायला सुरुवात केली आहे. त्यासाठीच तिने आदित्य आणि पारूला सावलीच्या गावी पाठविले आहे.
आता ती मुलगी कोणती, आदित्यला ती पसंत पडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सावळ्याची जणू सावली या मालिकेत दाखविल्याप्रमाणे प्रसिद्ध गायिका म्हणून ताराची ओळख आहे; मात्र तो आवाज सावलीचा आहे. सावलीची घरची परिस्थिती गरिबीची आहे. त्यात तिच्या भावाच्या दवाखान्याचा खर्च जास्त आहे. सावली ही ताराची असिस्टंट आहे, असे सगळीकडे सांगण्यात येते. मात्र, खरे तर तारा फक्त गाणे म्हणण्याचा अभिनय करते. तो आवाज सावलीचा आहे. ताराची आई सावलीच्या घरच्यांना याचे पैसे देते.

हेही वाचा: Video: चारुलता की भुवनेश्वरी? अक्षरा पडली संभ्रमात; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

आता पारू आणि सावली लहानपणीच्या मैत्रिणी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पारूला सावलीचा आवाज माहीत आहे. आता पारू तारा आणि सावलीचे सत्य सगळ्यांसमोर आणणार का? मालिकेत पुढे काय घडणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paaru and savlaychi janu savli new promo paaru will know the real voice of tara is savli nsp