‘पारू’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेचा सध्या महासंगम पाहायला मिळत आहे. पारू आणि सावली या दोघी मैत्रिणी असल्याचे दाखवण्यात आले असून दुसरीकडे आदित्य आणि सारंगदेखील एकमेकांचे मित्र आहेत. आता या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये आदित्यचा जीव धोक्यात असून त्याला मारायला गुंड आल्याचे दिसत आहे. याबरोबरच दामिनीदेखील पारूच्या गळ्यात काय आहे हे पाहण्यासाठी तिला त्रास देणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

‘पारू’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’चा महासंगम

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला आदित्य पारूला शोधत असल्याचे दिसत आहे. पारू कुठे आहेस तू? अशी हाक मारताना तो दिसत आहे. त्याला पाहताच एक व्यक्ती जगन्नाथला फोनवर सांगतो की तो आला आहे. जगन्नाथ त्या व्यक्तीला म्हणतो, “आधी त्याचे पाय मोडा आणि मग त्याचे हात मोडा, म्हणजे त्याची आई अहिल्यादेवी माझ्यासमोर हात जोडतील. आदित्यला मारण्यासाठी गुंड आले होते. दुसरीकडे पारू आदित्यसाठी देवळात प्रार्थना करते. देवासमोर हात जोडत म्हणते, “मला आदित्य सरांना खूश बघायचं आहे.” त्यावेळी दामिनीला तिच्या गळ्यातील मंगळसूत्र दिसते. दामिनी पारूला विचारते की, पारू तुझ्या गळ्यात काय आहे गं? पारू तिथून निसटते, मात्र दामिनी तिला पकडते आणि पटकन ते गळ्यातलं काढ म्हणून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढते. दामिनी म्हणते, नेमकं काय आहे गळ्यात, जे इतके दिवस माझ्यापासून लपवत होतीस. तितक्यात सावली पारूसमोर येते आणि तिच्या हातात मंगळसूत्र आहे. त्याचवेळी एक गुंड आदित्यला मारायला चाकू घेऊन येतो. आदित्यला तो मारणार, तितक्यात सारंग येतो आणि तो चाकू धरतो. दोघे मिळून गुंडांना मारतात.

Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
Rohini Hattangadi
“‘बाईपण भारी देवा’च्या रिलीजनंतर मी म्हटलं होतं…” रोहिणी हट्टंगडी यांनी सांगितली आठवण
sanju rathod kaali bindi new song after gulabi sadi massive success
‘गुलाबी साडी’नंतर संजू राठोडच्या ‘काळी बिंदी’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; मुख्य भूमिकेतल्या अभिनेत्रीला ओळखलंत का?
Shabana Azmi And Mahesh Bhatt
“त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात…”, शबाना आझमींनी सांगितली ‘अर्थ’ चित्रपटावेळची दिग्दर्शकाची आठवण; महेश भट्ट म्हणालेले, “मृत्यू जवळ अनुभवण्यासारखं…”
Nikki Tamboli
‘बाई’ हा शब्द कुठून मिळाला? निक्की तांबोळी म्हणाली, “माझ्या आयुष्यात सगळं…”
Loksatta editorial Loksatta editorial on symbolic changes in new lady of justice statue by supreme court
अग्रलेख: न्यायदेवता… न्यायप्रियता!
Abhijeet Sawant
‘मोहब्बतें लुटाऊंगा’ गाण्यामागची काय आहे गोष्ट? अभिजीत सावंत म्हणाला, ” इंडियन आयडॉलमध्ये जे…”
झी मराठी इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना, “पहायला मिळणार मैत्रीचा महासंगम…!”, अशी कॅप्शन दिली आहे.

आता या प्रोमोवर नेटकरी व्यक्त होताना दिसत आहेत. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. नेटकऱ्यांनी या प्रोमोवर संतप्त प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळत आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “अशी अंधश्रद्धा दाखवणे बंद करा आता. मंगळसूत्र निघताच लगेच संकट येते. आपली संस्कृती नक्की जपा. श्रद्धा दाखवा, अंधश्रद्धा नको”, दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले, “टीआरपीसाठी काहीही करतात ही लोकं.” आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “काहीही” असे म्हणत नेटकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: लग्नाच्या १४ व्या वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश! विवेक ओबेरॉयचं पत्नीला खास गिफ्ट, प्रियांका आहे माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी

तर काही नेटकऱ्यांनी, “उत्तम”, “तुम्ही जरा संयम ठेवा, पारू ही झी मराठीवरील एक नंबरवरील मालिका आहे”, असे म्हणत कौतुक केले आहे.

आता दामिनीला पारूचे सत्य समजणार का? सावली पारूला कशी वाचवणार, मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे