तीन महिन्यांपूर्वी ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरू झालेल्या ‘पारू’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील कथानकाने, कलाकारांनी अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतील पारू म्हणजेच अभिनेत्री शरयू सोनावणे आणि आदित्य म्हणजेच अभिनेता प्रसाद जवादे या नव्या जोडीला प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळताना दिसत आहे. याशिवाय अहिल्याबाई, मीरा, दामिनी, दिशा, श्रीकांत, मोहन, प्रीतम, सूर्यकांत ही पात्र देखील घराघरात पोहोचली आहेत. अशातच आदित्य म्हणजे प्रसादचा एक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यामध्ये तो खऱ्या आयुष्यातील बायकोसाठी खास पदार्थ बनवताना दिसत आहे.

अभिनेता प्रसाद जवादे याची बायको अभिनेत्री अमृता देशमुख आहे. लग्न झाल्यापासून दोघं नेहमी रोमँटिक फोटो, डान्स व्हिडीओ शेअर करत असतात. नुकताच अमृताने मिनी व्लॉग इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेता बायकोसाठी खास पदार्थ बनवताना दिसत आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”

हेही वाचा – Video: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये कॅटी पेरीचा रॉकिंग परफॉर्मन्स, अंबानींच्या पाहुण्यांना थिरकायला पाडलं भाग

अनेक मुलाखतीमध्ये अमृताने प्रसाद किती चांगलं जेवण बनवतो याविषयी सांगितलं होतं. तसंच तो तिच्यापेक्षाही उत्तम स्वयंपाक करतो, असं देखील ती म्हणाली होती. या व्हिडीओत त्याचा प्रत्यय पाहायला मिळत आहे. प्रसाद बायकोसाठी खास ऑम्प्लेट ब्रेड बनवताना दिसत आहे. अंड, कांदा, कोथिंबीर, दूध घालून आधी ऑम्प्लेट करतो. त्यानंतर त्यावर ब्रेड ठेवतो आणि काही वेळ प्रसाद ते ऑम्प्लेट ब्रेड एकत्र भाजताना दिसत आहे. मग तो ते बायको अमृताला सर्व्ह करतो. त्यानंतर दोघं हसत-खेळत गप्पा मारताना पाहायला मिळत आहेत.

हा व्हिडीओ शेअर करत अमृताने लिहिलं आहे, “तुम्हाला वास आला तर… प्रसाद ऑम्लेट ब्रेड बनवत आहे. माझा रॉकिंग-सॉलिड शेफ.” प्रसाद व अमृताचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Video: अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये गुरू रंधावाच्या गाण्यावर रणवीर सिंहने ओरीला उचलून घेतलं अन्…, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: विशाखा सुभेदारची भाची झळकली ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत, अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

या व्हिडीओवर दोघांच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “खूप मस्त”, “अल्टी पलटी अंडा ब्रेड ऑम्प्लेट”, “किती गोड आहात तुम्ही दोघं”, “मनासारखा जोडीदार भेटायला भाग्य लागत”, “अमृता तुझ्यापेक्षा प्रसाद क्यूट आहे”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या असून प्रसादचं कौतुक करत आहेत.

Story img Loader